Salman Khan Backs CJP: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा CJP आंदोलनाला पाठिंबा! "पेपर लीक हा गंभीर विषय, पण..."

Salman Khan Support CJP Protest: दिल्लीत सीजेपीच्या (CJP) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने पाठिंबा दर्शवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Salman Khan Support CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) पेपर लीकप्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणांसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेत्यांनंतर आता बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने या आंदोलनाचे समर्थन केले असून, पेपर लीक प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सलमान खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शालेय दिवसांतील एक जुना फोटो शेअर करत एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

'हिंसक वळण लागल्याचे पाहून दुःख झाले'

सोमवारी संसदेवर काढण्यात आलेल्या मार्चदरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चकमकीचा आणि लाठीचार्जचा संदर्भ देत सलमान खानने लिहिले की, "एवढ्या शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागावे, याचे मला खूप दुःख होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना दुखापत झाली आहे, त्यांच्याबद्दल मला तीव्र सहानुभूती आहे. पेपर लीक हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. देशातील मुले एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, हे पाहून मला आनंद वाटतो."

Advertisement

'या मुद्द्याचे राजकीय अपहरण होऊ देऊ नका'

विद्यार्थ्यांच्या या 'आंदोलना'चे आणि धैर्याचे कौतुक करताना सलमानने या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे स्पष्ट आवाहन केले.  हा मुद्दा केवळ विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्यातील आहे. राजकीय पक्षाने हे आंदोलन हायजॅक करु नये. या लढ्याचे संपूर्ण श्रेय केवळ देशातील विद्यार्थ्यांनाच मिळाले पाहिजे.

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

सलमान खानची पोस्ट

सरकारकडून सहकार्याची अपेक्षा 

मला खात्री आहे की सरकार विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करेल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करेल. देशात शिक्षण हा एक नवीन 'फॅशन ट्रेंड' बनला पाहिजे. शिक्षण इतके लोकप्रिय व्हावे की परदेशातील विद्यार्थ्यांनी भारतात शिकण्यासाठी यावे आणि भारत हे जगभरातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनेल.

(नक्की वाचा-  Palghar School Holiday: पालघरमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)

बॉलिवूड कलाकारांचा आंदोलनाला पाठिंबा

याआधी ओमी वैद्य, झीनत अमान, नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभय देओल, सोनाक्षी सिन्हा, अतुल कुलकर्णी आणि रितेश देशमुख यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी सीजेपीच्या या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सलमान खानच्या या पोस्टमुळे आता या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे.
 

Advertisement