Air India Plane Crash Song: अहमदाबाद विमान दुर्घटनेवर गाणं, 3 दिवसात साडेपाच लाख व्ह्युज

संजो बघेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन दिवसांतच या गाण्याच्या व्हिडिओला युट्यूबवर 5 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Song on Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान 12 जून रोजी दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान दुर्घटनेत 275 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये विमानातील 241 प्रवाशांचा समावेश आहे. जगभरातील लोकांना या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.  बिहारचे गायक संजो बघेल यांनीही या घटनेवर एक म्युझिक व्हिडिओ बनवला आहे. संजो बघेलने यांनी घटनेचा 14 मिनिटांचा व्हिडिओ बनवला आहे. 

(नक्की वाचा - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?))

संजो बघेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन दिवसांतच या गाण्याच्या व्हिडिओला युट्यूबवर 5 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

पाहा व्हिडीओ

(नक्की वाचा-  Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी)

संजो बघेल यांनी यापूर्वी मेरठ सौरभ हत्याकांड, राजा रघुवंशी हत्याकांड, पहलगाम हल्ला यासारख्या मोठ्या घटनांवर गाणी बनवली आहेत. जी युट्यूबसह सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय झाली आहेत. संजो बघेलचे युट्यूबवर ६ लाखांहून अधिक सबस्क्राइबर आहेत. चाहते त्याच्या गाण्यांवर खूप प्रेम करतात, म्हणूनच त्याच्या प्रत्येक व्हिडिओला जवळजवळ लाखो व्ह्यूज मिळतात.