2 months ago

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 75 दिवस उलटले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्या आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीही यावर निराशा व्यक्त केली आणि गोऱ्हेंनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचं म्हटलं आहे. 

Feb 24, 2025 18:57 (IST)

Sangli Food Poisoning: वनप्रशिक्षण केंद्रातील 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातुन विषबाधा

अमरावती चिखलदरा  येथुन  पलूस तालुक्यातील कुंडल येथील वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात भेट देण्यासाठी आलेल्या सुमारे 65   प्रशिक्षणार्थींना प्रवासा दरम्यान खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील रुग्णांवर पलूस येथील ग्रामीण रुग्णालयज्ञ व कुंडल येथील आरोग्य मंदिर  तसेच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात  उपचार सुरु आहेत.

Feb 24, 2025 18:37 (IST)

Pune News: गुंड गजा मारणेला अटक, पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली आहे. याआधी या मारहाण प्रकरणात गजा मारणे टोळीतील काही जणांना अटक करुन मकोकाची कारवाई करण्यात आली होती. 

Feb 24, 2025 17:13 (IST)

Live Update: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

शासनाने दिलेल्या सदनिका बनावट दस्ताऐवज करुन लाटल्याप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेला त्यांनी आव्हान दिले होते. याप्रकरणाची सुनावणी पार पडली असून कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थिगिती देण्यात आली आहे. 

Feb 24, 2025 17:05 (IST)

Live Updates: राज्यात काँग्रेसची सद्भावना यात्रा निघणार: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

 अलिकडच्या काळात महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. जातीय वाद दुर्देवाने वाढत आहे 

- ⁠आज महाराष्ट्र जातीय वादाचे लोण वाढले आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा राजकारण न करता एक उपक्रम हाती घेतला आहे. ⁠जातीय वाढ का होतोय यासाठी सदभावना असणे गरजेचे आहे 

- ⁠सदभावना करण्यासाठी जागर करण्याची भुमिका काँग्रेस घेणार आहे. ⁠सध्या बीड चर्चेत आहे जातीय वाद मुळे , बीडची आज बदनामी होत आहे सगळ्यांसमोर अशा पद्धतीने बीड समोर येत आहे. ⁠8 मार्चला सद्भावना पदयात्रा बीडमधुन सुरू होणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. 

Advertisement
Feb 24, 2025 16:07 (IST)

Palghar Accident: पालघरमध्ये हिट अँड रन, भरधाव कारने तरुणाला चिरडले

पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील मधुर नाका येथे एका भरधाव कार चालकाने पादचाऱ्याला कारची धडक देऊन 15 ते 20 मिटर कारखाली फडफटत नेले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावरून कार नेऊन त्याला चिरडले. मच्छिंद्र बागल असे या पादचाऱ्याचे नाव असून अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  पाठीमागून आलेल्या निर्दयी कार चालकाने पादचारी मच्छिंद्र बागल यांना फरफडत नेलं यात मच्छिंद्र बागल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बोईसरच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अपघातानंतर कार चालक कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. या  कार चालकाचा शोध बोईसर पोलिसांकडून सुरू आहे.

Feb 24, 2025 16:06 (IST)

Live Updates: रणवीर अलाहाबादियाची चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचला

इंडियाज गॉट लॅटेंट कार्यक्रमात अश्लील वक्तव्य प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वादग्रस्त वक्तव्यकेल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर असलेला रणवीर अलाहाबादिया अखेर चौकशीसाठी हजर झाला आहे.

Advertisement
Feb 24, 2025 15:40 (IST)

Live Update : इगतपुरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ, लखनऊ एक्स्प्रेस 2 तास थांबवल्यानं प्रवाशी संतप्त

इगतपुरी रेल्वेस्टेशनमध्ये प्रवाशांचा गोंधळ, लखनौ एक्स्प्रेस दोन तास थांबवल्यानं प्रवाशी संतप्त 

Feb 24, 2025 14:21 (IST)

Live Update : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

 कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

- कोकाटे यांच्या विरोधात दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या कन्या न्यायालयात करणार दावा दाखल

- अॅड. अंजली दिघोळे राठोड दावा दाखल करणार 

- माणिकराव कोकाटे यांच्या अपील अर्जाच्या विरोधात हस्तक्षेप अर्ज दाखल करणार

Advertisement
Feb 24, 2025 12:37 (IST)

Live Update : सोलापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक..

- सोलापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक..

- सोलापुरातील सात रस्ता परिसरात कर्नाटकला जाणाऱ्या बसला अडून बसला काळेपासून बसच्या काचेवर जय महाराष्ट्र लिहून व्यक्त करण्यात आला निषेध..

- बेळगाव येथील महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला आडून वाहक आणि चालकाला काळे फासण्याचा झाला होता प्रकार..

- बेळगाव येथील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदारपणे व्यक्त करण्यात आला निषेध..

- कानडी बस चालकाचा हार आणि भगवा रंग लावून बेळगाव प्रकरणाचा व्यक्त करण्यात आला निषेध 

- शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कानडी चालकाने जय महाराष्ट्र म्हटल्यानंतरच बस झाली विजापूरच्या दिशेने रवाना.. 

- सोलापूरवरून विजापूरच्या दिशेने जाणारी बस शिवसेना ठाकरे गटाने होती अडवली..

- महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटकात सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा कर्नाटकातील बस सोलापुरात फोडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला..

Feb 24, 2025 09:18 (IST)

Live Update : बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला GBS चा रुग्ण, साडे आठ वर्षाचा बालकाला लागण

बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला GBS चा रुग्ण...

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील साडे आठ वर्षाचा बालकाला झाली GBS ची लागण...

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू...

Feb 24, 2025 09:04 (IST)

Live Update : मुंबईत उकाडा वाढला, मंगळवारपासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी ३७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले

तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आद्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

Feb 24, 2025 08:57 (IST)

Live Update : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करावी अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि धनगर समाज तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. 

नुकतीच मध्यप्रदेश सरकारने इंदूर येथील महेश्वर येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वर्षाला सन्मान दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील चोंडी येथे बैठक घेऊन सर्व समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे निर्णय घ्यावेत हेच सरकारच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना खरे अभिवादन ठरेल असं देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

Feb 24, 2025 08:55 (IST)

Live Update : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीने मिळवली फिलिपिन्स देशातून डॉक्टरेट

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकिने फिलिपिन्स देशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे, वैष्णवी विठ्ठल जायभाये असे विद्यार्थिनीचे नाव असून ती विद्यार्थिनी हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गोजेगावची रहिवासी आहे, या मुलीने गावातून पहिली डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे, वैष्णवीच्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे..

Feb 24, 2025 08:54 (IST)

Live Update : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्या बाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे..

मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावत याबाबतची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली.आज या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Feb 24, 2025 08:12 (IST)

Live Update : काँग्रेस मुख्यालय टिळक भवनात सोमवार व मंगळवारी बैठकांचे सत्र

काँग्रेस मुख्यालय टिळक भवनात सोमवार व मंगळवारी बैठकांचे सत्र.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा

सोमवारी २४ फेब्रुवारीला सर्व जिल्हा अध्यक्षांची व २५ ला प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे

या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे 

तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी-यांशी चर्चा करणार आहेत