जाहिरात
3 hours ago

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 75 दिवस उलटले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्या आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीही यावर निराशा व्यक्त केली आणि गोऱ्हेंनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचं म्हटलं आहे. 

Live Update : बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला GBS चा रुग्ण, साडे आठ वर्षाचा बालकाला लागण

बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला GBS चा रुग्ण...

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील साडे आठ वर्षाचा बालकाला झाली GBS ची लागण...

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू...

Live Update : मुंबईत उकाडा वाढला, मंगळवारपासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी ३७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले

तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आद्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

Live Update : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करावी अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि धनगर समाज तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. 

नुकतीच मध्यप्रदेश सरकारने इंदूर येथील महेश्वर येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वर्षाला सन्मान दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील चोंडी येथे बैठक घेऊन सर्व समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे निर्णय घ्यावेत हेच सरकारच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना खरे अभिवादन ठरेल असं देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

Live Update : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीने मिळवली फिलिपिन्स देशातून डॉक्टरेट

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकिने फिलिपिन्स देशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे, वैष्णवी विठ्ठल जायभाये असे विद्यार्थिनीचे नाव असून ती विद्यार्थिनी हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गोजेगावची रहिवासी आहे, या मुलीने गावातून पहिली डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे, वैष्णवीच्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे..

Live Update : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्या बाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे..

मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावत याबाबतची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली.आज या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Live Update : काँग्रेस मुख्यालय टिळक भवनात सोमवार व मंगळवारी बैठकांचे सत्र

काँग्रेस मुख्यालय टिळक भवनात सोमवार व मंगळवारी बैठकांचे सत्र.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा

सोमवारी २४ फेब्रुवारीला सर्व जिल्हा अध्यक्षांची व २५ ला प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे

या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे 

तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी-यांशी चर्चा करणार आहेत