मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच पहिला आरोपी असून त्यानेच हा कट रचून हत्या घडवल्याचे या आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही मोठी घडामोड मानली जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणासह अॅट्रोसिटी आणि खंडणी या तिन्ही प्रकरणातील एकत्रित आरोपपत्र बीड येथील मकोका न्यायालयातून केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे केजच्या न्यायालयातच ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मार्चला होणार आहे.
LIVE Update: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणात अजून दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छेडछाडीप्रकरणी अनिकेत भोई , पियुष मोरे ( महाजन) , सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणी चेतन भोई , सचिन पालवे या दोन जणांविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल
LIVE Update: सोलापुरात घोरपड या वन्यप्राण्याचे गुप्तांग तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
- सोलापुरात घोरपड या वन्यप्राण्याचे गुप्तांग तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
- तब्बल 151 घोरपडीच्या गुप्तांगांची तस्करी करत असताना 3 आरोपींना रंगेहात पकडले
- सोलापुरात वनविभागाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आलीय
- सोलापूर वनविभागाच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले
- घोरपड वन्यप्राणी हा वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेडूल एक मध्ये येत असून अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे.
- घोरपडीची शिकार करणे आणि विक्री करणे याला 10 हजार रुपये दंड आणि 7 वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा आहे.
- सदर गुन्हेगार हे बीड जिल्ह्यातील असून ते सराईत गुन्हेगार आहेत.
Amravati Crime: अमरावतीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, परिसरात खळबळ
अमरावतीत जुन्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या
आदर्श साहू असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव...
अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मशानगंज मधील घटना...
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू...
Shirur Crime: शिरुर तालुक्यात कारेगाव येथे बलात्कार करून सोन लुटले; दोन आरोपीना अटक
शिरुर तालुक्यात कारेगाव येथे एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकुचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये घडला असुन रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
LIVE Updates: मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी.
माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी.
सात किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा.
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी.
शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी सातत्याने होते माणगाव मध्ये वाहतूक कोंडी.
पर्यटकांन बरोबर सर्वसामान्य नागरिकांना ही होतो वाहतूक कोंडी चा त्रास.
LIVE: ठाण्यात जोरदारा राडा! दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आज ठाण्यात मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याआधी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत हे ठाण्यामधील आनंदाश्रमात पोहोचले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही आल्याने दोन्ही गटामध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
IND VS NZ LIVE: टीम इंडियाची खराब सुरुवात; तीन दिग्गज स्वस्तात आऊट
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आहे. टीम इंडियाला तिसऱ्याच षटकात शुभमन गिल आऊट झाल्याने पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 15 धावांवर आणि विराट कोहली 30 धावांवर आऊट झाला. सध्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या 22 व्या षटकात टीम इंडियाने 87 धावा झाल्या असून तीन गडी बाद झालेत.
विदर्भाने तिसऱ्यांदा पटकावले रणजी स्पर्धेचे विजेतेपद
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळ संघाला एक डावाने नमवून विदर्भ संघाने तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे.
MVA Press Conference: अत्याचाराच्या घटनांवर सरकार कोणतीही भूमिका घेत नाही: विरोधकांचा संताप
वाल्मिक कराडाला कशी व्हीआयपी वागणूक दिली जाते, ही वस्तुस्थिती आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून पकडला जात नाही. तीन महिन्यानंतर आरोपी मोकाट आहे. दुर्दैवाने गावकऱ्यांना उपोषण करावं लागतं. प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना सरकार संरक्षण देते. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या इतिहासकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. प्रशांत कोरटकरला जेलमध्ये टाकायला हवं होतं. महिलांवरील अत्याचाच्या घटनांवर सरकार कोणतीही भूमिका घेत नाही, असे म्हणत विरोधकांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्य सरकारवर निशाणा साधला.
LIVE Update: अधिवेशनाआधी विरोधक आक्रमक, संध्याकाळच्या चहापानावर बहिष्कार
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्याआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. राज्यात सुरु असलेल्या अत्याचारांच्या घटनांवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे, तसेच आज संध्याकाळी होणाऱ्या चहा पानावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
IND Vs NZ: न्यूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना पार पडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Live Update : MNS च्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची उपस्थिती
MNS च्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची उपस्थिती, ईव्हीएमवर आधारित एक पुस्तक संदीप देशपांडेंकडून राऊतांनी भेट
Live Update : मविआच्या बैठकीला काँग्रेस आमदारांची दांडी, विरोधी पक्ष नेतेपदावरुन मविआत धुसफूस?
मविआच्या बैठकीला काँग्रेस आमदारांची दांडी, विरोधी पक्ष नेतेपदावरुन मविआत धुसफूस?
Live Update : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा
पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा
शहराला यंदा मुबलक पाणी मिळणार
दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 दशलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी कोटा कायम ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने पुणेकणारांची सध्या तरी पाण्याची चिंता मिटली आहे
Live Update : महाविकास आघाडीतील आमदारांची थोड्याच वेळात बैठक होणार सुरू
महाविकास आघाडीतील आमदारांची थोड्याच वेळात बैठक होणार सुरू
उद्यापासून अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू होणार आहे
त्याआधी कोण कोणत्या मुद्यांवर विरोधकांना घेरायचं आणि काय मुद्दे उपस्थित करायचे या संदर्भात चर्चा होणार आहे
त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते पदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार आहे याची देखील चर्चा केली जाणार आहे
बैठक संपल्यावर दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद होणार आहे
Live Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर
पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली असून पारा 39 अंशांवर पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा 36 ते 38 अंशांपर्यंत पोहचला होता. मागील 8 दिवसांपासून उकाडाही वाढला आहे. परिणामी शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली असून 10 ते 11 अंशांवर असलेले किमान तापमान आज 14 अंशापर्यंत पोहोचले. दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान 39 अंश इतके नोंदविले गेले
Live Update : राज्यमंत्री मंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे होणार
राज्यमंत्री मंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी राज्यमंत्री मंडळ बैठक आणि चहापान कार्यक्रम आयोजन केले. विरोधक चहापान यावर बहिष्कार टाकणार हे जवळपास ठरले असून कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्प अधिवेशनात कोणते विधेयक मांडली जाणार तसंच नवीन कायदे केले जाणार याची चर्चा केली जाईल.
Live Update : स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार
स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले. आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. बसची फॉरेन्सिक चाचणी केली त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉजिटिव्ह आली आहे
Live Update : म्हसोबा यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार
महाराष्ट्रातील काही नामवंत मैदाना पैकी सांगलीच्या शिराळा तालुक्यातील रेठरे धरण येथे म्हसोबा यात्रेनिमित्त आमदार सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी आयोजित केलेल्या देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवण्यात आलं होतं. यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडाला 3 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तब्बल 500 हुन अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे 3 लाख 5 हजार 559 रुपये बक्षिसाचे मानकरी भद्रा मारुती प्रसन्न , मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजी नगर, आणि द्वितीय क्रमांक 2 लाख 55 हजार 559 रुपये बक्षिसांचे मानकरी मल्लिकार्जुन प्रसन्न सरपंच संजयकुमार नामदेवराव शिंगटे मुरूम, तर तृतीय क्रमांक 2 लाख 5 हजार 559 रुपये बक्षिसांचे मानकरी केदारेश्वर प्रसन्न विजय कबुले शिरवळ, आरोही पंकज घाडगे शिरसवाडी, हे ठरले आहेत..
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची संस्कृती असून या शर्यती सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या शर्यती सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सुरू केलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीसाठी आमच्या सरकारकडून लागेल ती मदत केली जाईल असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.