- बिहार के मुजफ्फरपुर के एक श्मशान घाट में बच्चों के लिए एक पाठशाला मार्च 2017 में चल रही है.
- श्मशान घाट की इस पाठशाला में आज कुल 140 बच्चे कक्षा एक से ग्यारहवीं तक पढ़ाई करते हैं.
- बच्चों को ड्रेस, बैग, किताबें, पेंसिल, कॉपी, बैठने का आसन और सर्दी में स्वेटर कंबल मुफ्त प्रदान किए जाते हैं.
सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला मैदान असतं. मात्र तुम्ही कधी स्मशानभूमीतील शाळा पाहिली आहे का? बिहारमधील मुजफ्फरपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका स्मशानभूमीत मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एके ठिकाणी चितेला अग्नी दिला जात असताना दुसरीकडे मुलं अभ्यास करीत असल्याचे अनेक फोटो समोर आले आहेत.
जळणाऱ्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास...
ही स्मशानभूमी मुजफ्फरपूर येथील सिंकदरापूर ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. येथे एकीकडे चिता जळत असते तर दुसरीकडे बसून मुलं अभ्यास करतात. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे स्मशानभूमीत बसून अभ्यास करायला या मुलांना अजिबात भीती वाटत नाही. या मुलांनी स्वत: यबाबत सांगितलं. ते म्हणतात, की ते येथे आरामात बसून अभ्यास करतात.
२०१७ मध्ये या स्मशानभूमीत शाळेची सुरुवात झाली. एकदा सुमीत कुमार नावाची व्यक्ती एकाच्या अंत्यसंस्कारासाठी येथे पोहोचले होते. त्यावेळी गरीब कुटुंबातील मुलं या स्मशानभूमीच्या जवळपास फिरत असल्याचं सुमीतने पाहीलं. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुमीतने त्यांच्या शाळेसाठी प्रयत्न सुरू केले. शेवटी २०१७ मध्ये मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांनी एक शाळा सुरू केली.

स्मशानभूमीतील शाळेत १४० विद्यार्थी शिकतात...
सुरुवातीला मुलं स्मशानभूमीतील शाळेत जाण्यास घाबरत होते. मात्र हळूहळू सुमीतने मुलांना एकत्र केलं आणि आता स्मशानभूमीत १४० विद्यार्थी शिकतात. येथे पहिली ते अकरावीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. याशिवाय मुलांना ड्रेस, बॅग, पुस्तकं, पेन्सिल, रबर, बसण्यासाठी आसनं आणि थंडीत स्वेटरची व्यवस्थाही शाळेकडून केली जाते.
नक्की वाचा - लव्ह जिहादचा मोठा खुलासा, हिंदू मुलीशी लग्न केल्यास 10 लाखांचं बक्षीस; मुस्लीम पत्नीने पतीची केली पोलखोल

या शाळेत शिकणाऱ्या काही मुलांना आयपीएस व्हायचंय तर कोणाला इंजिनियर, तर काही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतोय. येथील विद्यार्थ्यांना स्वसुरक्षेसाठी मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं जातं.
मुलांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण...
या शाळेत शिकणाऱ्या काही मुलांना आयपीएस व्हायचंय तर कोणाला इंजिनियर, तर काही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतोय. येथील विद्यार्थ्यांना स्वसुरक्षेसाठी मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं जातं. महिलांवर होणारे अत्याचार लक्षात घेता मुलांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी आणि जागरुक राहण्याचं शिक्षण दिलं जातं. 130 विद्यार्थी-विद्यार्थ्यांना दोन गटात विभागण्यात आलं आहे. सीनियर सेशनमध्ये एकूण ७० विद्यार्थी आहेत. ज्यात ५० मुली आणि २० मुलं आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यातील चांगली कामगिरी करणाऱ्या दहा मुलांची निवड केली जाते. या मुलांवर त्यांच्या घराजवळील कमीत कमी १० मुलांना शिकविण्याची जबाबदारी सोपवली जाते.
तर ज्युनियर सेशनमध्ये ६० मुलांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचा आत्मविश्वास, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
