Namita Thapar Viral Video: एमक्युअर फार्मास्यूटिकल्सच्या कार्यकारी संचालिका आणि शार्क टँक इंडियाच्या जज नमिता शापर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी सोशल मीडिया ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. नमाजवरील विधानामुळे ट्रोल झाल्यानंतर थापर यांनी ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. गप्प राहणे हा कोणताही गुण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.तसच स्वतःला ‘प्राऊड हिंदू'असल्याचंही त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.मार्च महिन्यात नमाजचे आरोग्यविषयक फायदे सांगणाऱ्या एका पोस्टमुळे नमिता थापर इंटरनेटवर ट्रोल झाल्या होत्या.त्यानंतर आता त्यांनी याप्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
‘सूर्य नमस्कार'ला आक्षेप नाही, मग ‘नमाज'वर का?
नमिता थापर यांनी सोमवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी स्वतःविरोधात आणि त्यांच्या आईविरोधात होत असलेल्या अश्लील कमेंट्सचा तीव्र निषेध केला. त्यांनी ‘सेलेक्टिव आऊटरेज' (निवडक संताप) यावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की,यापूर्वी जेव्हा त्यांनी ‘सूर्य नमस्कार'च्या फायद्यांविषयी बोलले होते,तेव्हा कुणीही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती.
I left for bombay at 6.30 am like the hard working professional that I am & stopped the car at 7 am to make this reel as I've long realised that silence is not a virtue & one must speak up when they are disrespected. Yes if wrong things happen at any workplace that are against… pic.twitter.com/rvMSu0wXz0
— Namita (@namitathapar) April 20, 2026
नक्की वाचा >> Jalna News: लॉकडाऊन काळात एकट्या महिलेसोबत संधी साधली, आरोपीला 'ते' कृत्य करणं पडलं महागात, पुढे असं घडलं..
“मला शिकवले गेले आहे की धर्माचा अर्थ आदर (R for Respect) असा असतो. महिलांप्रती असा अपमानास्पद वर्तन करणे म्हणजेच आदर आहे का? जेव्हा महिलांचा अनादर केला जातो, तेव्हा सगळे गप्प का राहतात?”, असा सवालही थापर यांनी उपस्थित केला आहे.हा संपूर्ण वाद मार्च महिन्यात सुरू झाला,जेव्हा नमिता यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.
नक्की वाचा >> आता पेट्रोलचं टेन्शन संपणार! सरकार आणतंय नवं इंधन, काय आहे Flex Fuel? जुन्या गाडीत चालणार का?
त्या पोस्टमध्ये त्यांनी नमाज पठणाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरील फायदे सांगितले होते. यानंतर सोशल मीडियावरील एका वर्गाने त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्न उपस्थित केले. आता नमिता यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे हे स्पष्ट झाले आहे की त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ट्रोलिंगला घाबरणार नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world