लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
Jalna Crime News Today : जालन्यात कोरोना लॉकडाऊन काळात महिलेचा विनयभंग करणं एकाला चांगलेच महागात पडलं आहे.रमेश अशोक साळवे असं या आरोपीचं नाव आहे. भोकरदन तालुक्यातील जानेफळ गावात लॉकडाऊनच्या वेळी आरोपी रमेशने महिला एकटी असताना तिचा विनयभंग केला होता. "तू मला कशाला बोलावले होते,माझं एकदा काम कर.मला भेट ",असं म्हणत आरोपीने महिलेचा विनयभंग केला होता. याबाबत कोणालाही सांगू नको,असं धमकावत आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत मारहाणही केली होती.याप्रकरणी पीडित महिलेनं पारध पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान,न्यायालयाने विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांनीही दिली साक्ष
कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी आरोपीने महिलेसोबत भयंकर कृत्य केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वेगाने तपास केला होता.पोलिसांनी आरोपी विरोधात दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भोकरदन यांचे न्यायालयात दाखल केले होते.या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांचे म्हणणे ऐकून याप्रकरणी निकाल दिला. गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांची सुद्धा साक्ष घेतली.
नक्की वाचा >> आता पेट्रोलचं टेन्शन संपणार! सरकार आणतंय नवं इंधन, काय आहे Flex Fuel? जुन्या गाडीत चालणार का?
पीडितेने घटनेबाबत दिलेली माहिती आणि पोलीस हवालदार प्रकाश शिंनकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. निकाल देताना न्यायाधीश मयुरेश आर काळे यांनी कलम 323,354, 504,506 अंतर्गत आरोपीला शिक्षा सुनावली.आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपीने पीडित महिलेला ही रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
नक्की वाचा >>Video: मोठं झाल्यावर रणवीर सिंग बनणार! शाळेच्या असाइनमेंटमध्ये मुलानं लिहिली मनातली गोष्ट, मॅडमही झाल्या थक्क
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world