Namita Thapar Viral Video: एमक्युअर फार्मास्यूटिकल्सच्या कार्यकारी संचालिका आणि शार्क टँक इंडियाच्या जज नमिता शापर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी सोशल मीडिया ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. नमाजवरील विधानामुळे ट्रोल झाल्यानंतर थापर यांनी ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. गप्प राहणे हा कोणताही गुण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.तसच स्वतःला ‘प्राऊड हिंदू'असल्याचंही त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.मार्च महिन्यात नमाजचे आरोग्यविषयक फायदे सांगणाऱ्या एका पोस्टमुळे नमिता थापर इंटरनेटवर ट्रोल झाल्या होत्या.त्यानंतर आता त्यांनी याप्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
‘सूर्य नमस्कार'ला आक्षेप नाही, मग ‘नमाज'वर का?
नमिता थापर यांनी सोमवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी स्वतःविरोधात आणि त्यांच्या आईविरोधात होत असलेल्या अश्लील कमेंट्सचा तीव्र निषेध केला. त्यांनी ‘सेलेक्टिव आऊटरेज' (निवडक संताप) यावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की,यापूर्वी जेव्हा त्यांनी ‘सूर्य नमस्कार'च्या फायद्यांविषयी बोलले होते,तेव्हा कुणीही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती.