रामराजे शिंदे, नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. तर बड्या नेत्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि विधानसभा निवडणूक जागावाटप तसेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊत यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात बहुतेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलण्यासाठी ते आले होते, त्यांनी भेटी घेऊन चर्चा केली. या भेटीचं फलित इतकचं आहे की आम्ही तिन्ही पक्ष विधानसभेला एकत्र सामोरं जात आहोत. आमचं आघाडीत सगळं सुरुळीत सुरू आहे.
(नक्की वाचा- आईनंतर पूजा खेडकरांच्या वडिलांवर टांगती तलवार; पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
मुंबईत 16 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या तीन पक्षाचा एकत्र मेळावा होणार आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात निवडणुकीच्या अनुषंगाने यावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. विधानसभा निवडणुकीबाबतचे सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकष शिथिल, कुणाला मिळणार मदत?)
महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचं आहे हे आम्ही ठरवलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आगामी काळात समजेल. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगण्याची सध्या वेळ नाही आणि ही जागाही नाही. आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग ते सांगू, असं संजय राऊत म्हणाले.