जाहिरात

Groom Died : नवरीच्या समोरच नवऱ्याने सोडला जीव, सप्तपदीदरम्यान काय घडलं?

Madhya Pradesh News : दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हर्षितचे गोपालगंजमध्ये मेडिकल स्टोअर असून काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न ठरले होते.

Groom Died : नवरीच्या समोरच नवऱ्याने सोडला जीव, सप्तपदीदरम्यान काय घडलं?
हर्षित का गोपालगंज में मेडिकल स्टोर था

नवरदेवाचा लग्नमंडपातच मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमधील सागर येथे घडली आहे. 28 वर्षीय हर्षित चौबे याचा लग्नमंडपातच हार्टअॅटॅकने मृत्यू झाला आहे. ज्या व्यक्तीसोबत हर्षित त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार होता तिच्यात मांडीवर त्याने प्राण सोडला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

नातेवाईक, मित्रपरिवार अशा सर्वांच्या साक्षीने एकमेकांना जीवनसाथी बनवण्यासाठी नवरा-नवरी दोघेही सज्ज होते. दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्ने पाहिली. बँड, बाजा, बारात... अशी सगळी तयारी झाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद होता. मात्र लगबग सुरु असलेल्या लगीनघरात क्षणात शोककळा पसरली. 

(नक्की वाचा- Beed News : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! एसटी बसने तिघांना चिरडलं)

मिळालेल्या माहितीनुसार, सप्तपदी सुरु असताना हर्षितला हार्टअॅटॅक आला. अग्नीला फेऱ्या मारत असताना हर्षितला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत दुखत होतं. त्याने ही गोष्ट होणाऱ्या पत्नीला सांगितली. मात्र थकल्यामुळे असं होत असेल असं तिने म्हटलं. मात्र काही वेळात हर्षितचा अधिक त्रास होऊ लागला आणि तो खाली बसला. काही वेळातच नवरीच्या मांडीवर तो बेशुद्ध झाला. 

(नक्की वाचा- Pune News : सावकाराच्या जाच; पत्नी आणि मुलाला संपवून पीडित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल)

मंडपात उपस्थित असलेल्यांना तातडीने हर्षितला रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हर्षितचे गोपालगंजमध्ये मेडिकल स्टोअर असून काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न ठरले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com