Shocking news: 'साहेब, बायकोला शोधून द्या' प्रेमविवाहानंतर 8 वर्षांचा सुखी संसार, एक फोन कॉल अन् पत्नी गायब

"साहेब, माझा मुलगा आईसाठी व्याकूळ झाला आहे, कृपया तिला शोधून द्या," अशी विनंती राहुल याने पोलिसांना केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुण्यात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या राहुल राजपूत यांच्या पत्नी अंजली अचानक घरातून निघून गेली
  • राहुल आणि अंजली यांचा प्रेम विवाह साडेआठ वर्षांपूर्वी झाला होता आणि त्यांना सात वर्षांचा एक मुलगा आहे
  • फोनवर झालेल्या वादानंतर अंजलीने कोणालाही काही न सांगता घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची पत्नी अचानक गायब झाली. विशेष म्हणजे या दोघांची प्रेम विवाह झाला होता. ऐवढेच नाही तर त्यांचा आठ वर्ष सुखी संसारही झाला. त्यांना एक मुलगा ही होता. पण ती अचानक अशी गायब झाल्याने पती हवालदिल झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडली आहे. काही करा पण माझ्या पत्नीला शोधा असा टाहोच त्याने पोलीसांसमोर फोडला आहे.   

आपल्या बेपत्ता पत्नीला शोधून काढण्यासाठी एका हतबल पतीने मध्य प्रदेशातील मोतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. राहुल राजपूत असं या पतीचे नाव आहे. तो पुण्यात ड्रायव्हर म्हणून काम करतो. आपल्या पत्नीच्या शोधासाठी पोलिसांकडे त्याने मदतीची याचना केली आहे. त्या दोघांना सात वर्षांचा मुलगा आहे. मुलाच्या मायेसाठी त्यांनी दिलेली हाक पाहून पोलीसही हेलावले आहेत. त्यांनी ही आता राहुलच्या पत्नीला शोधण्यासाठी कंबर कसली आहे. 

नक्की वाचा - 'ती तुरुंगात, तिला जाळू शकत नाही म्हणून तिची साडी जाळणार' राजा रघुवंशीच्या आईचा टाहो

राहुल राजपूत आणि आरती उर्फ ​​अंजली यांचा साडेआठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना सात वर्षांचा एक मुलगाही आहे. राहुल कामानिमित्त पुण्यात राहत होता. तर त्याची पत्नी अंजली ही मध्य प्रदेशातील सागरमधील तिच्या माहेरी राहत होती. 26 फेब्रुवारी रोजी फोनवर दोघांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अंजली कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तेव्हा पासून तिचा काही एक पत्ता लागलेला नाही. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण ती सापडली नाही. शेवटी कुटुंबीयांनी पोलीसात धाव घेतली. 

नक्की वाचा - Unique Holi: येथे रंगांनी नाही तर 'राखे'ने खेळतात होळी! वाचा 'या' प्रसिद्ध मंदिराची अजब परंपरा

अंजली बेपत्ता झाल्याचे समजताच राहुल तातडीने पुण्यातून सागरला पोहोचला. रविवारी दुपारी मोतीनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. "साहेब, माझा मुलगा आईसाठी व्याकूळ झाला आहे, कृपया तिला शोधून द्या," अशी विनंती राहुल याने पोलिसांना केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, आम्ही आजूबाजूच्या परिसरात माहिती दिली असून कोणालाही या महिलेबद्दल माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा

मोतीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून विविध पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की, जर कोणाला संबंधित महिलेबाबत काही माहिती मिळाली तर त्यांनी त्वरित मोतीनगर पोलीस ठाण्याला कळवावे. एका फोनवरील वादाने सुखी संसाराला गालबोट लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाय या प्रकरणाला आणखी काही वेगळी किनार आहे का याचा ही तपास पोलीस आता करत आहेत.