जाहिरात

Shocking News: 10 दिवसांचं प्रेम, रुमवर रोमान्स.. शारीरिक संबंधावेळी अल्पवयीन मुलीचा मृत्यू; असं काय घडलं?

Bihar Minor Girl Death Case: पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या मुलाला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

Shocking News: 10 दिवसांचं प्रेम, रुमवर रोमान्स.. शारीरिक संबंधावेळी अल्पवयीन मुलीचा मृत्यू; असं काय घडलं?

Bihar Minor Girl Death News:  बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जहानाबाद येथील एका अल्पवयीन मुलीचा तिच्या कथित प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना जक्कनपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. पाटणा पोलिसांनी त्या मुला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Navi Mumbai: सासूने जावयाला हाताशी धरलं, ड्रग्जचा बाजार मांडला, छाप्यात घबाड सापडलं

10 दिवसाचं प्रेम अन्...
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीची 10 दिवसांपूर्वी मसौरी येथील एका मुलाशी भेट झाली. 10 दिवसांच्या या भेटीचे प्रेमात रुपांतर झाले.  दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले ज्यानंतर त्यांच्यामध्ये नियमित संवाद होऊ लागला. प्रेमात बुडालेल्या या मुला- मुलीचा भेटायचा प्लॅनही ठरला.  त्या मुलाने संबंधित अल्पवयीन मुलीला त्याच्या मित्राच्या खोलीत बोलावले. 

तिथे दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधावेळी मुलीला रक्तस्त्राव होऊ लागला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. शनिवारी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या मुलाला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एकाच रात्रीत 5 दुकाने लुटली, CCTV ची तोडफोड; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुलीच्या आजोबांनी सांगितले की तिने पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर तिने शाळेत जाणे बंद केले. तिचे वडील सुतारकाम करतात. मुलगी जहानाबादला जात असल्याचे सांगून घरून निघून गेली होती. ती पाटण्याला कशी पोहोचली हे कुटुंबातील सदस्यांना माहिती नाही. आजोबांनी सांगितले की माहिती मिळाल्यानंतर ते पाटण्याला पोहोचले तेव्हा त्यांना त्यांच्या नातीच्या मृत्यूची माहिती मिळाली. जक्कनपूरचे प्रभारी एसएचओ मनीष कुमार म्हणाले की, निवेदन मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि चौकशी सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com