- गोपालगंज जिल्ह्यातील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंटू बरनवालने तीन वर्षांत तीन लग्न केली आहेत
- त्याने आधीच्या पत्नीशी घटस्फोट न करता एकापाठोपाठ दुसरे लग्न केले असून दोन मुलेही आहेत
- पहिल्या दोन पत्नींनी पिंटूवर हुंडा मागणे, जबरदस्तीने संबंध ठेवणे आणि छळाचे गंभीर आरोप पोलीसांना केले आहेत
सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांना हरताळ फासणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना उघड झाल्यानंतर तिथल्या लोकांच्यात नाही तर पोलीसांच्या ही पाया खालची वाळू सरकली आहे. या घटनेत पिंटू नावाच्या तरुणीने एक,दोन नाही तर तीन लग्न केली. विशेष म्हणजे ही लग्न त्याने तिन वर्षात केली. त्याला दोन मुले ही आहेत. धक्कादायक म्हणजे त्याने कुणालाही घटस्फोट न देता एकामागो माग एक लग्न केले आहे. मात्र चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा अजब दावा ऐकून पोलीस ही चक्रावून गेले आहेत.
3 वर्षांत 3 लग्न
बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरूप समईल गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंटू बरनवाल नावाच्या व्यक्तीने 3 वर्षांत 3 लग्ने केल्याची माहिती उघड झाली आहे. त्याच्या दोन पत्नींना जेव्हा हे वास्तव समजले, तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांनी ही तक्रार नोंदवताना पिंटूवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय त्यांनी पिंटूच्या कुटुंबीयांवर ही काही आरोप केले आहे. या प्रकरणात पिंटूच्या तिसऱ्या पत्नीची अजून ही एन्ट्री झालेली नाही. पण दोन पत्नींनी त्याच्या विरोधात आता आक्रमक भूमीका घेतली आहे. शिवाय फसवणूक झाल्याची त्यांची भावना ही त्यांनी बोलून दाखवली आहे.
पत्नींचे गंभीर आरोप
पिंटूची पहिली पत्नी खुशबू कुमारी आणि दुसरी पत्नी गुड़िया कुमारी या दोघींनीही त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खुशबूने तिच्या सोबत झालेल्या प्रकाराचा काळाचिठ्ठा खोलला आहे. 2022 मध्ये पिंटू सोबत लग्न झाल्याचं तिने सांगितलं खुशबु ही पिंटूची पहिली पत्नी आहे. तिचा आरोप आहे की हुंड्यासाठी तिचा छळ केला गेला.तसेच पिंटून जबरदस्तीने तिच्या सोबत संबंध ठेवले. शिवाय सुहागरात्रीच्या दिवशीच आक्षेपार्ह व्हिडिओ ही बनवल्याचा तिचा आरोप आहे. दुसरी पत्नी गुड़िया हिचा असा दावा आहे की, तिचे लग्न 2024 मध्ये झाले होते. तिला पिंटूच्या पहिल्या लग्नाबद्दल काहीही माहिती नव्हती. पिंटूने आता घटस्फोट न घेता सारण जिल्ह्यातील एका मुलीशी तिसरे लग्न केले आहे. तिला एक बाळही आहे. असा दावा केला आहे.
"लग्न करणे ही माझी मजबूरी होती!"
अटक झाल्यानंतर पिंटूने पोलिसांसमोर अजब तर्क मांडला. तो म्हणाला, "मी एका स्त्रीमध्ये जे गुण शोधत होतो, ते मला पहिल्या दोन पत्नींमध्ये मिळाले नाहीत, म्हणून मी पुन्हा लग्न केले." त्याने असाही आरोप केला की, त्याच्या पत्नी त्याच्यावर चाकूने हल्ला करायच्या आणि त्याच्या आईला जेवण देत नव्हत्या. आपण कधी ही त्यांच्याकडून हुंडा मागितला नाही असं ही त्याने सांगितले आहे. शिवाय तिन लग्न केल्याचे ही त्याने मान्य केले आहे. मात्र, पोलिसांनी दोन्ही पत्नींच्या तक्रारीवरून त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात धाडले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world