एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिला सुरक्षित आहेत की नाहीत याची चर्चा सर्वत्र होत आहे. महिला सबलीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न ही केले जात आहे. मात्र एकीकडे या गोष्टी होत असताना दुसरीकडे मात्र एक धक्कादायक आणि सर्वांना हादरवून सोडणारी ही घटना समोर आली आहे. ती म्हणजे मुलींच्या हॉस्टेलमध्ये कन्डोमचा खच आढळून आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना दिल्लीत घडली आहे.
दिल्लीत एका चांगल्या परिसरात मुलींचे हॉस्टेल आहे. हे हॉस्टेल PG गर्ल हॉस्टेलम्हणून प्रसिद्ध आहे. दिल्लीतील मुलींसाठीचं सर्वात प्रसिद्ध आणि सुरक्षित हॉस्टेल म्हणून या होस्टेलकडे पाहीले जाते. मात्र याच हॉस्टेलमध्ये कन्डोमचा खच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बिंग फुटण्यामागे ही एक निमित्त ठरले. ते म्हणजे हॉस्टेलची पाईल लाईन ब्लॉक झाली होती. त्यामुळे ती मोकळी करण्यासाठी प्लंबर हॉस्टेलमध्ये आला होता. त्याने ब्लॉक काढण्यासाठी सुरूवात केली.
ब्लॉक काढण्यासाठी काही ठिकाणी पाईल लाईन खोलावी लागली. त्याच वेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्डोम अडकल्याचे दिसून आले. ड्रेनेज लाईन तर संपूर्ण पणे कन्डोमने भरली होती. टॉयलेटच्या टाकीतही कन्डोमचा अक्षरश: खच पडला होता. हे काम सुरू असताना एकाने याचा व्हिडीओ तयार केला. तोच व्हिडीओ सध्या सोशल माडियावर जोरादार पणे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर हॉस्टेलच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हॉस्टेल प्रशासन कशा पद्धतीने देखरेख करत आहे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिवाय सुरक्षा व्यवस्थेचे काय अशी ही विचारणा सोशल मीडियावर होत आहे. इतके कन्डोम गर्ल होस्टेलमध्ये सापडत असतील तर तिथे नक्की काय होत असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली असून त्याची चर्चाही होताना दिसत आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेबाबत बोलले जाते तर दुसरीकडे अशी घटना समोर येत आहे.