Nitin Gadkari : नंबर प्लेटनंतर आता वाहनांचे हॉर्न बदलणार? काय आहे सरकारचा प्लान?

भारताला दुचाकी आणि कारच्या निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळतो. भारत सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nitin Gadkari

येत्या काही दिवसांत तुम्हाला तुमच्या गाडीच्या हॉर्नमधून ढोलकी किंवा बासरीचा आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ही माहिती दिली. नितीन गडकरी म्हणाले की, असा कायदा करण्याचा विचार आम्ही करत आहोत, ज्याअंतर्गत वाहनांच्या हॉर्नमध्ये फक्त भारतीय वाद्यांचा आवाज वापरता येईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नितीन गडकरी काय म्हणाले?

नितीन गडकरी यांनी म्हटलं की, सर्व वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांवर आधारित म्हणजेच बासरी, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम यांचे असावेत, असा कायदा तयार करण्याच्या आम्ही विचारात आहोत. जेणेकरून हॉर्न ऐकायला आनंददायी असतील. गडकरी एका वृत्तपत्राच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

(नक्की वाचा-  Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)

देशातील वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा वाटा 40 टक्के आहे. नरेंद्र मोदी सरकार ग्रीन आणि जैवइंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे, ज्यात मिथेनॉल आणि इथेनॉलचा समावेश आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले. 

गडकरी पुढे म्हणाले की, भारताला दुचाकी आणि कारच्या निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळतो. भारत सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. 2014 मध्ये भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र 14 लाख कोटी रुपयांचे होते, जे आता 22 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. फक्त अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Big news: 'ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं' भाजपचे मंत्री कुणावर भडकले?)

2014 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे मूल्य 14 लाख कोटी रुपये होते. जे आता 22 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. भारताने जपानला मागे टाकत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनली आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.

Topics mentioned in this article