महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. तापमान वाढल्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे. हवामान विभागानंच ही माहिती दिलीय. नैऋत्य मान्सून 31 पर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो देशातील अन्य भागात पुढं सरकेल.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार देशात अल निनो सिस्टम कमकुवत होत आहे. तर ला नीना सक्रीय होत आहे. यंदा देशात चांगला पाऊस पडण्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे देशात यंदा नेहमीपेक्षा लवकर मान्सून दाखल होऊ शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी कधी दाखल झाला होता मान्सून?
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 2019 साली केरळमध्ये 6 जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात 8 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं. 2020 साली 1 जून, 2021 मध्ये 3 जून, 2022 साली 29 मे आणि 2023 साली 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता.
( नक्की वाचा : मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त; हवामान विभागाकडून इशारा )
काय आहे भेंडवळचा अंदाज?
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणाऱ्या भेंडवळ भविष्यावर राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्यांचेही लक्ष असते. यामध्ये आगामी वर्षातील पावसाचा भविष्य व्यक्त केला जातो. या भविष्यवाणीनुसार 24-25 जून महिन्यात पाऊस कमी पडेल. त्यानंतर जुलै महिन्यात साधारण पाऊस होणार आहे. ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात होईल. तर सप्टेंबर महिन्यात यंदा दमदार पाऊस असेल, असं भेंडवळचं भविष्य आहे.