IAS टीना डाबी यांना 'रील स्टार' म्हटलं, पोलिसांनी विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात?

पोलिसांनी कोणालाही अटक किंवा ताब्यात घेतल्याचा दावा फेटाळून लावला आहे. परिस्थिती शांत करण्यासाठी केवळ 4 मुलांना पोलीस ठाण्यात आणले होते आणि नंतर सोडून दिले, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tina Dabi
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • College students in Rajasthan alleged that they were detained for calling IAS officer Tina Dabi a "reel star"
  • They called Dabi, Barmer's district collector, a "reel star" for not addressing their concerns
  • Dabi rejected the allegations, saying no one got arrested or detained
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
New Delhi:

देशातील सर्वात चर्चेत असणाऱ्या आयएएस (IAS) अधिकारी आणि बाडमेरच्या जिल्हाधिकारी टिना डाबी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बाडमेरमधील महाराणा भूपाल कन्या महाविद्यालयाबाहेर परीक्षा शुल्कातील वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डाबी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डाबी यांना "रोल मॉडेल" म्हणण्याऐवजी "रील स्टार" म्हटल्यामुळे पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

वादाचे नेमके कारण काय?

शनिवारी 'अभाविप'शी संबंधित विद्यार्थी महाविद्यालयाबाहेर निदर्शने करत होते. यावेळी एका सरकारी अधिकाऱ्याने टीना डाबी या विद्यार्थ्यांसाठी "रोल मॉडेल" असल्याचे सांगितले. यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत म्हटले की, "जिल्हाधिकारी रोल मॉडेल नाहीत. जर असत्या, तर त्यांनी आमचे प्रश्न ऐकण्यासाठी येथे यायला हवे होते. त्या फक्त 'रील स्टार' आहेत, रिल्स बनवण्यासाठी कुठेही जातात, पण विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत."

(नक्की वाचा-  Santosh Deshmukh Case: "मला बोलयचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

पोलिसांची आणि टीना डाबी यांची भूमिका

या विधानानंतर तणाव वाढला आणि पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेले. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी कोणालाही अटक किंवा ताब्यात घेतल्याचा दावा फेटाळून लावला आहे. परिस्थिती शांत करण्यासाठी केवळ 4 मुलांना पोलीस ठाण्यात आणले होते आणि नंतर सोडून दिले, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी टिना डाबी यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, "कोणालाही अटक केलेली नाही. शुल्कवाढीचा प्रश्न सुटलेला असतानाही काही मुले रस्ता अडवून गोंधळ घालत होती. त्यांना केवळ समजावण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले होते. हा सर्व प्रकार समाजमाध्यमांवर स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी सुरू आहे."

Advertisement

(नक्की वाचा- पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)

राजकीय प्रतिक्रिया

या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतु्र्वेदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत टीना डाबी यांच्यावर टीका केली आहे. "भारतात नोकरशहा असहिष्णू होत चालले आहेत. सत्ता आणि भ्रष्टाचाराच्या नशेनंतर आता ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत," असे त्यांनी म्हटले आहे. अभाविपने देखील या कृतीचा निषेध करत लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे म्हटले आहे.

Topics mentioned in this article