Suicide drone : भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अनेक दहशतवाद्यांचा यात खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराने सुसाइड ड्रोन लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम्सचा वापर केला. याला कामिकाझे ड्रोन असेही म्हणतात. शत्रूंना शोधून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी हे सुसाईड ड्रोन डिझाइन केलेले आहेत. ड्रोनमध्ये एक वॉरहेड बसवलेले असते, ज्यामुळे स्फोट होतो.
सुसाईड ड्रोन बेंगळुरूमधील एका औद्योगिक वसाहतीत बनवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अल्फा डिझाइन आणि इस्रायलच्या एल्बिट सिक्युरिटी सिस्टम्सने संयुक्तपणे हे विकसित केले आहेत. 2021 मध्ये लष्कराने 100 हून अधिक या स्कायस्ट्रायकर ड्रोनची ऑर्डर दिली होती.
(नक्की वाचा- पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त; विध्वंसाचे सॅटलाईट Photo आले समोर)
सुसाईड ड्रोनची वैशिष्ट्ये
लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम ड्रोनची 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करून शत्रूवर हल्ला चढवण्याची क्षमता आहे. हा ड्रोन 5 किलो किंवा 10 किलो वजनाचे वॉरहेड वाहून नेऊ शकतो. विजेवर चालत असल्याने त्याचा आवाजही खूप कमी असतो. यामुळे ते कमी उंचीवरही आवाज न करता उडू शकतात. ज्यामुळे शत्रूंना याचा तपासही लागत नाही. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये सुसाईड ड्रोनच्या यशानंतर हे स्वस्त आणि प्रभावी शस्त्र मानले जात आहे. लांब अंतरावर अचूकपणे लक्ष्य गाठू शकते.
(नक्की वाचा- Bomb Blast in Lahore : साखळी बॉम्बस्फोटांनी पाकिस्तान हादरला, लाहोर विमानतळाजवळ 30- 40 मिनिटे स्फोट)
एल्बिट कंपनीने याबाबत सांगितलं की,स्कायस्ट्रायकर हे अनमॅन्ड एयरक्राफ्ट सिस्टमसारखे म्हणजे पायलयशिवाय उडते आणि क्षेपणास्त्रासारखा हल्ला चढवते. शांत, अदृश्य आणि अचानक हल्ला करणारा स्कायस्ट्रायकर अचूकतेने प्रहार करतो. शत्रूला शोधून मारणे हा नेहमीच सैन्याच्या रणनीतीचा एक भाग राहिला आहे. पण आता सेन्सर-टू-शूटर ऑपरेशन्सची जागा नवीन तंत्रज्ञानाने घेतली आहे.