
Serial Bomb Blast in Lahore : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तान साखळी बॉम्बस्फोटाने हादरला. लाहोरच्या वाल्टन विमानतळाजवळ साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. बॉम्बस्फोट कुणी घडवून आणले याबाबत कोणतीह ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. दहशतवादी हल्ला असण्याची दाट शक्यता आहे. मात्र खरं कारण तपासानंतर समोर येईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाहोरमधील वाल्टन विमानतळाजवळ एकामागून एक अनेक स्फोटांचे मोठे आवाज आले. दूरवर या स्फोटाचे आवाज ऐकू आले. मिळालेल्या माहितीनुसार, 30- 40 मिनिटे हे स्फोट सुरु होते. एका इमारतीच्या समोर हे स्फोट झाले आहेत.
स्फोटानंतर इमारतील धुराचे लोट पाहायला मिळाले. लाहोरमधील गुलबर्ग परिसर आणि वॉल्टन विमानतळाजवळील नसिहाबाद आणि गोपालनगर या भागांतही स्फोटाचे हादरे बसले. स्फोटानंतर परिसरात तात्काळ आपत्कालीन सायरन वाजले. या घटनेनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक घराबाहेर पडले. या घटनेनंतर लाहोरमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
(नक्की वाचा- पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त; विध्वंसाचे सॅटलाईट Photo आले समोर)
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बंडखोरांची संघटना असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैनिकांवर दोन हल्ले केले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 सैनिक ठार झाल्याची माहिती आहे.
(नक्की वाचा- भारताची नारी शक्ती! सोफिया कुरैशी-व्योमिका सिंहची सोशल मीडियावर चर्चा; भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव)
बीएलएने पाकिस्तानी लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोल आयईडी हल्ला केला. या स्फोटात स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांच्यासह सर्व 12 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्फोटात गाडीचे तुकडे झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world