नागपुरातूनही हेरगिरीचा प्रकार? बेपत्ता महिलेला पाकने भारताला सोपवलं, 14 वर्षांचा मुलगा कारगिलमध्येच; काय आहे प्रकरण?

अवैधपणे भारत-पाकिस्तान लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार करून पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेला पाकिस्तानी प्रशासनाकडून भारताकडे सोपवण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अवैधपणे भारत-पाकिस्तान लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार करून पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेला पाकिस्तानी प्रशासनाकडून भारताकडे सोपवण्यात आलं आहे. मूळची नागपूरची असलेली सुनिता जामगडे ही 43 वर्षांची महिला जम्मू-काश्मीरमधील कारगिलजवळील हंडरमान गावाजवळून अवैधरीत्या पाकिस्तानात गेली होती. एका ख्रिश्चन पाद्रीला भेटण्यासाठी ही महिला पाकिस्तानात गेल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुनीताने आपल्या 14 वर्षांच्या मुलाला कारगिलमधील एका स्थानिक हॉटेलमध्ये एकटं सोडून दिलं होतं. 'ऑपरेशन सिंदूर' सुरू असताना, भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या महिलेच्या कृत्यामुळे सीमा सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पोलीस चौकशीदरम्यान, सुनीता जामगडे ही पाकिस्तानमधील दोन जणांशी संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं आहे. यातील जुल्फीकार नावाच्या एका ख्रिश्चन पाद्रीसोबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आली होती. 

नक्की वाचा - Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?

नागपूरच्या कपिल नगर भागात राहणाऱ्या सुनीता विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात नागपूर पोलिसांकडून एक अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी सुनिताने दोन वेळा पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तिचे प्रयत्न दोन्ही वेळा अयशस्वी ठरले होते. या आधी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तिला अटक करून अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, सुनीताचा 14 वर्षांचा मुलगा सध्या कारगिलमधील बाल संरक्षण समितीच्या ताब्यात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article