NEET ची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

NEET-UG 2024 : परीक्षा पुन्हा घेतली तर त्याचे मोठे परिणाम होतील, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

NEET परीक्षेत झालेल्या घोळाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. परीक्षा पुन्हा घेतली तर त्याचे मोठे परिणाम होतील, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, परीक्षेचे पावित्र्य भंग झाल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. या वर्षासाठी NEET UG फेरपरीक्षा घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. जे या परीक्षेला बसणाऱ्या 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल आणि प्रवेश प्रक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होईल.

(नक्की वाचा - )

Advertisement

भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर आणि भविष्यातील डॉक्टरांवर त्याचा मोठा परिणाम होईल.वैद्यकीय शिक्षणात जागा वाटपात आरक्षण ठेवण्यात आले आहे, त्यांच्यासाठी देखील हे हानिकारक ठरेल, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटलं की, ज्यांनी अनियमिततेचा फायदा घेतला आहे त्यांना प्रामाणिक उमेदवारांपासून वेगळे करून ओळखणे शक्य आहे. त्यामुळे अनियमितता आढळली तरी त्यांचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. 

Advertisement

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )

त्या वादग्रस्त प्रश्नचं काय?

सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, NEET मध्ये नियोजनबद्ध घोटाळा केल्याचं आढळून आलेले नाही. भौतिकशास्त्राच्या वादग्रस्त प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, त्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 4 आहे. आम्ही आयआयटी दिल्लीचा अहवाल स्वीकारतो आणि त्यांच्या उत्तरानुसार NEET-UG चा निकाल पुन्हा जाहीर करावा. 

Topics mentioned in this article