जाहिरात

Surat News: बायकोला एका डोळ्याने दिसेना, पती कोर्टात गेला, न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला

एका डोळ्याने दिसत नसल्याची बाब लपवून ठेवून फसवणूक केल्याचा आणि त्यानंतर आत्महत्येची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप पतीने केला होता.

Surat News: बायकोला एका डोळ्याने दिसेना, पती कोर्टात गेला, न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला

Surat Family Court News:  पत्नीने आपल्याला एका डोळ्याने दिसत नसल्याची बाब पतीपासून लपवून ठेवली त्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पतीने केलेल्या बायको आंधळी असल्याच्या तक्रारीनंतर कोर्टाने नवऱ्याची घटस्फोटासाठीची याचिका मंजूर केली आहे. सुरतच्या कौटुंबिक न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या...

पत्नीला आंधळेपण, पतीला जामीन मंजूर..

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  लग्नापूर्वी जोडीदाराबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी लपवून ठेवणे आणि त्यानंतर उद्भवलेल्या वादातून जोडीदाराला धमकावणे हा क्रूरतेचाच प्रकार असल्याचे स्पष्ट करत, सुरतच्या कौटुंबिक न्यायालयाने एका २३ वर्षीय साडी व्यापाऱ्याला घटस्फोट मंजूर केला आहे. आपल्या पत्नीला एका डोळ्याने दिसत नसल्याची बाब लपवून ठेवून फसवणूक केल्याचा आणि त्यानंतर आत्महत्येची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप पतीने केला होता.

Mumbai News: भयंकर विकृती! गटारातून कुत्र्याचा आवाज.. नागरिक धावले अन् जे पाहिलं; घृणास्पद घटना

 लग्नानंतर काही दिवसातच पत्नी पडल्यामुळे पती तिला नेत्ररोग तज्ज्ञांकडे घेऊन गेला होता. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले की, तिच्या डाव्या डोळ्याला १७ डायोप्टर इतका मोठा नंबर असून तिला त्या डोळ्याने अजिबात दिसत नाही. ही बाब समजताच पतीने जाब विचारला असता, पत्नीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र, एप्रिल २०२२ मध्ये अहमदाबाद येथील रुग्णालयात झालेल्या तपासणीत सत्य समोर आले.

न्यायालयाने काय म्हटलं?

​केवळ शारीरिक व्यंग लपवले एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. पतीने जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पत्नीने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि स्वतःचे जीवन संपवण्याची धमकी दिली. न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(i-a) अंतर्गत हा छळ आणि क्रूरता असल्याचे मान्य केले. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला.

Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला मात्र कोंडी कायम; नव्या अडचणीमुळे पोलीसही हतबल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com