Mumbai News : मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधार कार्डाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र या प्रकरणात एका पतीनेच आपल्या पत्नीच्या आधारकार्डाचा गैरवापर केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात सूरतमधील एका व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीकडून पत्नीच्या आधार कार्डाचा गैरवापर...
मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एका व्यावसायिकाने बायकोच्या बनावट आधार कार्डाचा वापर केल्याचं उघडकीस आलं आहे. आपली बायको आहे असं भासवत या व्यक्तीने थेट प्रेयसीला हॉटेलमध्ये नेलं. हॉटेलमध्ये बायकोच्या ओळखीच्या व्यक्तीने या दोघांना बघितल्यानंतर बायकोला याबाबत कळवण्यात आलं. यानंतर बायकोने हॉटेलमध्ये येत सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. बायकोने नवऱ्याविरोधात आणि त्याच्या प्रेयसीविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बायकोच्या आधारकार्डावर प्रेयसी...
या पठ्ठ्याने बायको आहे असं सांगत प्रेयसीला हॉटेलवर नेलं. बायकोचे नाव वापरत प्रेयसीसाठी बनावट आधार कार्ड तयार करून घेतलं. हॉटेलमध्ये प्रवेशासाठी आधार कार्ड गरजेचे असतं. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने रचलेला डाव त्याच्याच अंगलट आला. या प्रकरणात सूरतमधल्या एका व्यावसायिकाविरोधात आणि त्याच्या प्रेयसीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world