तंत्रज्ञानाचा गैरवापर जीवावर बेतू शकतो, याचे विदारक उदाहरण सुरतमध्ये पाहायला मिळाले आहे. सुरतमध्ये दोन महाविद्यालयीन तरुणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यात ChatGPT चा वापर केल्याचे उघड झाले आहे. या हृदयद्रावक घटनेवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि 'X' (ट्विटर) चे मालक इलॉन मस्क यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुरतमध्ये नेमकं काय घडलं?
दोन तरुण तरुणी शुक्रवारी सकाळी कॉलेजला गेल्या होत्या, मात्र दुपारपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मोबाईल ट्रॅक केला असता त्यांचे लोकेशन सुरतमधील स्वामीनारायण मंदिराजवळ आढळले. मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दोघी स्वच्छतागृहात जाताना दिसल्या. पोलिसांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मृतदेहाजवळ भूल देणारी औषधे आणि सिरिंज आढळल्या.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा सुरत शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त एन. पी. गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणी बालपणीच्या मैत्रिणी होत्या. जेव्हा पोलिसांनी त्यांचे फोन अनलॉक केले, तेव्हा त्यांच्या 'ChatGPT' सर्च हिस्ट्रीमध्ये आत्महत्येसाठी कोणत्या औषधांचा वापर केला जाऊ शकतो, याचे सर्च रिझल्ट्स आढळले. त्यांच्या फोनच्या गॅलरीत एका बातमीचा स्क्रीनशॉट होता, ज्यामध्ये एका महिलेने भूल देणारे इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इलॉन मस्क यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका शब्दांत "Yikes" (बापरे! किंवा किती भयानक!) असे लिहून आपली भावना व्यक्त केली. मस्क हे सुरुवातीपासूनच चॅटजीपीटी बनवणाऱ्या 'OpenAI' कंपनीचे टीकाकार राहिले आहेत. त्यांनी सॅम ऑल्टमन यांच्यावर नफ्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचा आरोप करत खटलाही भरला आहे. (नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी) दोन जिवाभावाच्या मैत्रिणींना अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलण्यास नेमकी कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले, याचा तपास सुरत पोलीस करत आहेत. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फॉरेन्सिक टीम अधिक पुरावे गोळा करत आहे.'ChatGPT' सर्च हिस्ट्रीमध्ये काय आढळले?
इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया
Helplines Vandrevala Foundation for Mental Health 9999666555 or help@vandrevalafoundation.com TISS iCall 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)