जाहिरात

14-14 तास अभ्यास, पाण्याकडे दुर्लक्ष, किडनी फेल झाली, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या तरुणाचा संघर्ष

तीन वेळा पेपर फुटला. आता मी आजारी आहे. यावेळी पेपर फुटला. आता पुढचा पेपर तरी व्यवस्थित होईल की नाही माहित नाही असं ही तो म्हणाला.

14-14 तास अभ्यास, पाण्याकडे दुर्लक्ष, किडनी फेल झाली, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या तरुणाचा संघर्ष
  • लातूरच्या विश्वजीत तेलंगे यांनी तीन वर्षे सातत्याने नीट परीक्षेची तयारी केली पण पेपर फुटले
  • दीर्घकालीन अभ्यास आणि मानसिक ताणामुळे विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी
  • उपचार, डायलिसिस आणि औषधोपचार सुरू असतानाही विश्वजीतने डॉक्टर बनण्याचा निर्धार कायम ठेवला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लातूर:

विष्णू बुरगे

Latur News: नीटचे पेपर फुटले. त्याचा फटका देशातील लाखो विद्यार्थ्यांना बसला. संपूर्ण तयारी करून ही त्यांच्या पदरात निराशा पडली. पण एक विद्यार्थी असा आहे ज्याने या परिक्षेसाठी आपले आयुष्यच पणाला लावले. गेल्या तीन वर्षापासून तो नीटची तयारी करतोय. प्रत्येक वेळी पेपर फुटले आणि या तरुणाचे स्वप्न भंगले. यावेळी ही तसेच झाले. या विद्यार्थ्याने 14-14 तास अभ्यास केला. त्यामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष झाले. एकाच ठिकाणी बसल्याचा ही परिणाम झाला. त्यामुळे त्याची किडनी ही फेल झाली. अशा स्थितीत ही तो जिद्द हरलेला नाही. या तरुणाचा संघर्ष (Inspirational story) आपण पाहणार आहोत. 

विश्वजीत तेलंगे. हा लातूरचा तरुण. गंभीर आजाराशी झुंज देत डॉक्टर होण्याचं स्वप्न तो पाहत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो सातत्याने नीट परीक्षेची तयारी करत आहे. तीन वेळा परीक्षा देऊनही काही गुणांनी त्याचा वैद्यकीय प्रवेश हुकला आहे. आता नीटचा पेपर फुटला आहे. त्यामुळे त्याच्या स्वप्नांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सततचा अभ्यास, मानसिक ताण आणि आरोग्याशी सुरू असलेल्या लढाईमुळे विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्याच्या आजींने स्वतःची किडनी दान करत त्याला नवजीवन दिलं. उपचार सुरू असतानाही हॉस्पिटल, डायलिसिस, औषधोपचार आणि अभ्यास यांच्यात विश्वजीतची झुंज सुरूच राहिली. पण पेपर फुटले आणि पुन्हा एकदा त्याच्या समोर मोठे संकट उभे राहीले. 

नक्की वाचा - Akola News: '500 रुपयांसाठी 18 एकर शेती पेटवली' प्रकरण ऐकून अंगावर काटा येईल

डॉक्टर बनण्याचं एकच स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून तो एकच ध्यास अभ्यास हे डोळ्या समोर ठेवून तयारी करत आहे. विश्वजीत तेलंगे सांगतो की करणारे करत राहाणार, आता आपल्याला भोगायचं काम राहीलं आहे. आपल्या हातात कष्ट करणं राहीलं आहे. ज्यांच्या हातात पॉवर आहे, पैसे आहेत, त्यामुळे ते सर्व काही करून सुटतील असं त्याने पेपर फुटीवर सांगितलं. तो पुढे सांगतो माझं जे धेय्य आहे ते मी पुर्ण करणार, काही झालं तरी डॉक्टर होणार असा निर्धार त्याने बोलून दाखवला. त्यांनी पेपर फोडू दे नाही तर काही करू नये आपला निश्चय पक्का आहे.  गेल्या चार वर्षापासून तयारी करतोय. तीन वेळा पेपर फुटला. आता मी आजारी आहे. यावेळी पेपर फुटला. आता पुढचा पेपर तरी व्यवस्थित होईल की नाही माहित नाही असं ही तो म्हणाला. 

नक्की वाचा - LPG Subsidy: 3o जूननंतर मिळणार नाही एलपीजी सबसिडी, eKYC बंधनकारक, घरबसल्या 'अशी' पूर्ण करा प्रक्रिया

तर विश्वजीतचे वडीलांनी ही या सर्व गोष्टी मुळे हैराण झाले आहेत. सर्व सिस्टम बोगस आहे. आमच्या सारख्यांच्या गरिब लेकरांनी अभ्यास आणि अभ्यास करणे येवढच आहे. माझ्या मुलाचं नुकसान कुणीच भरू शकत नाही. सरकार ही भरू देवू शकत नाही. सरकारमुळेच आणि त्यांच्या पद्धतीमुळेच मुलाचे नुकसान झाले आहे. सततचा अभ्यास, त्यातून घेतलेला ताण, पाणी पिण्याकडे केलेले दुर्लक्ष आणि सतत बसून केलेला अभ्यास यामुळे मुलाच्या किडन्या फेल झाल्या असं ही ते सांगतात. माझा मुलगा अपंग झाला आहे असं ही ते म्हणाले. याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न त्यांनी केला. पेपर तुमच्या चुकी मुळे फुटले असं सांगत त्यांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com