जाहिरात

CM Vijay: रजनीकांत तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांच्या यशावर जळतात? स्वत:चं स्पष्टीकरण देत केला मोठा खुलासा

त्यांनी या आधी स्टालिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्यावर टीका सुरू झाली.

CM Vijay: रजनीकांत तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांच्या यशावर जळतात? स्वत:चं स्पष्टीकरण देत केला मोठा खुलासा
  • अभिनेता विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दाक्षिणात्य राजकारणात मोठा बदल झाला आहे
  • रजनीकांत यांनी विजय यांच्या यशावर टीका आणि मत्सर असल्याच्या अफवांचे जोरदार खंडन केले आहे
  • रजनीकांत म्हणाले की त्यांना राजकारणात नसल्याने कोणाच्या यशावर मत्सर वाटणे अशक्य आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. या मोठ्या राजकीय यशानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे महानायक रजनीकांत यांच्यावर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून टीका केली जात होती. विजय यांच्या यशावर रजनीकांत हे जळत आहेत. त्यांना याचा हेवा वाटत नाही असा दावा काहींनी समाज माध्यमांवर केला. तशी चर्चा ही तामिळनाडुमध्ये सुरू झाली आहे. या संपूर्ण वादावर आता खुद्द 'थलायवा' रजनीकांत यांनी मौन सोडले असून अत्यंत कडक शब्दांत उत्तर दिले आहे.

आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रजनीकांत यांनी या अफवांचे पूर्णपणे खंडन केले. ते म्हणाले, "माझ्यावर काही लोक टीका करत आहेत, की मला मुख्यमंत्री विजय यांच्याबाबत आकस आहे. पण मी जेव्हा राजकारणातच नाही, तर मी कोणाचा मत्सर का करू? विजय आणि माझ्यामध्ये एका संपूर्ण पिढीचे अंतर आहे. मी त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे." विजय यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. ते नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा - CNG Prices Hike: महागाईचा भडका! दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांत CNG महागला, पाहा नवे दर

निवडणूक निकालानंतर रजनीकांत यांनी एम. के. स्टालिन यांची भेट घेतली होती. ज्यामुळे या वादाला खतपाणी मिळाले. यावर बोलताना रजनीकांत म्हणाले, "आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. मी इतक्या खालच्या पातळीचा माणूस नाही की कोणाच्या यशावर विनाकारण भाष्य करेन. जर मी 2021 मध्ये निवडणूक लढवली असती, तर मी नक्कीच जिंकलो असतो." असं ही ते यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - Kalyan News: रेल्वे स्थानकावरून 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण, रेल्वे यार्डात लैंगिक अत्याचार, CCTV मुळे...

तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून अभिनेता विजय यांनी पदभार सांभाळल्यापासून दाक्षिणात्य राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका भेटीमुळे सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. रजनीकांत यांना विजय यांच्या यशाचा त्रास होत आहे, अशा कमेंट्स केल्या जात होत्या. अखेर या ट्रोलर्सना रजनीकांत यांनी स्वतः समोर येत चोख उत्तर दिले आहे. त्यांनी या आधी स्टालिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्यावर टीका सुरू झाली. मात्र त्यांना आता या सर्व चर्चांवरच पुर्ण विराम दिला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com