
Tej Pratap Yadav Girlfriend Anushka Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेज प्रताप यादव यांनी शनिवारी त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित एक मोठा गौप्यस्फोट केला. तेज प्रताप यादव यांनी एका मुलीसोबतचा आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याचबरोबर, ते दोघे 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये (नात्यात) असल्याचेही त्यांनी सांगितले. तेज प्रताप यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही दोघे गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. एकमेकांवर प्रेमही करतो.' या पोस्टसोबत तेज प्रताप यादव यांनी जो फोटो पोस्ट केला आहे, त्यात ते एका मुलीसोबत दिसत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे ती मुलगी?
तेज प्रताप यादवसोबत फोटोमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव अनुष्का यादव आहे. ही माहिती स्वतः तेज प्रताप यादव यांनीच आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. तेज प्रताप यादव यांनी लिहिले की, 'मी तेज प्रताप यादव आणि माझ्यासोबत या फोटोमध्ये जी दिसत आहे, तिचे नाव अनुष्का यादव आहे! आम्ही दोघे गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेमही करतो. आम्ही दोघे गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत."
तेज प्रताप यादव यांनी पुढे लिहिले की, 'मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो होतो, पण कशी सांगू हे समजत नव्हते. त्यामुळे आज या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातील गोष्ट तुमच्या सगळ्यांसमोर मांडत आहे. आशा करतो की तुम्ही सगळे माझ्या गोष्टी समजून घ्याल.'
( नक्की वाचा : 15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )
अर्ध्या तासानंतर पोस्ट डिलीट
तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर ही पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली, तर काही जणांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासानंतर तेज प्रताप यादव यांनी ही पोस्ट डिलीट केली.

काही वेळानंतर पुन्हा तोच फोटो आणि मेसेज पोस्ट
मात्र, काही वेळानंतर त्यांनी पुन्हा तीच पोस्ट फेसबुकवर केली. आता लालू प्रसाद यादव यांचे कुटुंबीय या प्रेमाचा कसा स्वीकार करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण कारण तेज प्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यातील मतभेदानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world