जम्मू-काश्मीरच्या राजकीय मैदानात दहशतवादी अफजल गुरूचा भाऊ, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार?

अपक्ष निवडणूक लढवणारे एजाज अहमद गुरू हे संसदेवर हल्ला करणारा दोषी अफजल गुरू यांचा भाऊ आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
श्रीनगर:

जम्मू-काश्मीरमध्ये 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. अंतिम टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार-प्रसार जोमात सुरू आहे. सोपोर विधानसभा मतदारसंघातून दहशतवादी अफजल गुरूचा भाऊ एजाज अहमद गुरू निवडणूक लढवत आहे. विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे एजाज अहमद गुरू यांनी सांगितलं की, विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अडचणी या केंद्रशासित प्रदेशातील व्यापक समस्या दर्शवतात. 

आपली वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न...
अपक्ष निवडणूक लढवणारे एजाज अहमद गुरू हे संसदेवर हल्ला करणारा दोषी अफजल गुरू यांचा भाऊ आहेत. सोपोर विधानसभा मतदारसंघातील उन्नतीसाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं वचन एजाज गुरू यांच्याकडून करण्यात आलं आहे. यानिमित्ताने राजकीय क्षेत्रात वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नक्की वाचा - Pune News : हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?

माझ्या भावाचा दृष्टिकोन वेगळा, माझा वेगळा - एजाज अहमद
एजाज गुरू यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, माझ्या भावाचा दृष्टिकोन वेगळा होता आणि माझा वेगळा आहे. एजाज गुरू पुढे म्हणाले, माझं लक्ष अलिप्ततावादी विचारसरणीपेक्षा विकासावर आधारित आहे. सोपोरमधील तरुण बेरोजगार आहे आणि गेल्या चार-पाच वर्षांत महागाई वाढल्याने अनेक अडचणी येत आहेत. 

Advertisement

विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार...
दहशतवादी अफजल गुरूचा भाऊ एजाज गुरू विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावरुन निवडणूक लढवत आहेत. याशिवाय वंचितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - वक्फ बोर्ड वरून समिती सदस्यांमध्येच जुंपली, सेना-तृणमुलचे खासदार भिडले, नक्की कारण काय?

कोण आहे अफजल गुरू?
अफजल गुरू याला डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर हल्ल्याचं कारस्थान रचल्याच्या  आरोपाखाली 9 फेब्रुवारी 2013 रोजी तिहार तुरुंगात फाशी दिली होती. आता त्याचा भाऊ सोपेरमधून विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. 
 

Advertisement