जाहिरात

Terror Attact : 3 वर्षांपासून बेपत्ता, कधी माशीदेखील मारली नाही; काश्मीर हल्ल्यातील दहशतवादी आसिफच्या बहिणीचा अजब दावा

दहशतवादी आसिफ शेख याचं घर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या बहिणींनी संताप व्यक्त केला आहे.

Terror Attact : 3 वर्षांपासून बेपत्ता, कधी माशीदेखील मारली नाही; काश्मीर हल्ल्यातील दहशतवादी आसिफच्या बहिणीचा अजब दावा

Kashmir Pahalgam terror attack : पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरातील लष्कराच्या कारवाई दरम्यान मोठा स्फोट झाला. यामध्ये दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त झालंय. प्रसंगावधानामुळे सुरक्षा रक्षक थोडक्यात बचावले आहेत. दहशतवादी आसिफ शेख याचं घर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या बहिणींनी संताप व्यक्त केला आहे. आसिफ शेख याच्याशी तीन महिन्यांपासून संपर्क नसल्याचं त्या म्हणाल्या.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 तीन वर्षांपासून आसिफला पाहिलं नसल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं. दहशतवाद्यांना शोधा, आम्हाला का त्रास देता असा सवाल आसिफच्या बहिणीने केला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची सुटका करा. गेल्या तीन वर्षात आमचं आसिफशी बोलणं झालं नाही. पहलगाममधील पर्यटकांसोबत जे घडलं त्याबद्दल अत्यंत दु:ख वाटतंय. त्यांना न्याय मिळायला हवा.

Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

माझा भाऊ दहशतवादी असेल तर त्याला पकडावं. मात्र आमच्या घराची अशी अवस्था का केली? असा सवाल आसिफच्या बहिणीने उपस्थित केला आहे. आमचं त्याच्याशी काहीही बोलणं झालं नाही. काही माहिती असती तर पोलिसांना सांगितलं असतं. गेल्या तीन वर्षात आसिफने कोणालाच मारल्याची माहिती ऐकली नाही. त्याने कधी माशीदेखील मारली नाही, त्यामुळे तो इतक्या जणांना मारू शकेल हे कशावरुन? तो अक्रोडचा व्यवसाय करण्याचं सांगून गेला त्यानंतर पुढे कधीच आला नाही, असंही ती पुढे म्हणाली. 

काश्मीरमधली आदिल ठोकर आणि आसिफ शेखची घरं उद्ध्वस्त...

आदिल आणि आसिफ हेच दोघे दहशतवादी ज्यांचा पहलगाम हल्ल्यात हात होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं काश्मीर खोऱ्यात शोध मोहीम तीव्र केलीय. भारतीय लष्कर, एनआयए आणि काश्मीर पोलीस दहशतवाद्यांच्या मागावर आहेत. पहलगाम हल्ल्यात दोन स्थानिक दहशतवाद्यांनी मदत केल्याची माहिती  सुरक्षा दलांना मिळाली. आसिफ शेख आणि आदिल गुरी हेच ते दोघे स्थानिक दहशतवादी आहेत. पोलिसांनी आसिफ आणि आदिलची घरी शोधली. अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा ब्लॉकमधल्या गुरी गावात आदिल ठोकरचं घर आहे. आदिलच्या घरात स्फोटक पदार्थ सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर आसिफ शेखचं त्रालमध्ये घर आहे. सुरक्षा दलांनी ही दोन्ही घरं उध्वस्त केली. आदिलच्या घरातल्या स्फोटक पदार्थाचा स्फोट झाला, त्यात आदिलच्या घराला आग लागली. तर त्रालमधल्या आसिफच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.  आदिल ठोकरला आदिल गुरी म्हणूनही ओळखलं जातं. त्याला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आलंय. अनंतनाग पोलिसांनी आदिलच्या अटकेसाठी आणि आदिलबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. आदिल 2018 मध्ये बेकायदेशीरपणे पाकिस्तानला गेला होता, जिथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. पहेलगामच्या बैरसन दरी परिसरात पर्यटकांवर हल्ला करण्याची योजना आखणं, पहलगाम हल्ला करणं आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्यामध्ये आदिलचा सहभाग असल्याचं समजतंय.  दहशतवादी आदिल ठोकरच्या दोन भावांना सुरक्षा दलानं ताब्यात घेतलंय. त्याच्या दोन्ही भावांची चौकशी सुरु करण्यात आलीय. त्यातून आणखी माहिती समोर येणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: