Tirupati Temple Prasad Fake Ghee : देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक तिरुमाला तिरुपती देवस्थानातील लाडूच्या प्रसादाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर केला जात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा तिरुपतीच्या लाडवांसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भातील (Tirumala Tirupati Temple) मोठा घोटाळा समोर आला आहे.
सीबीआय तपासानुसार, उत्तराखंडच्या एका डेअरीने पाच वर्षांपर्यंत तिरुपती मंदिराला ६८ लाखांचं बनावटी, भेसळयुक्ती तूप सप्लाय केलं. ज्याची किंमत तब्बल २५० कोटींची असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विशेष तपास टीमने सांगितलं की, भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी २०१९ ते २०२४ पर्यंत तूप सप्लाय करीत होते. धक्कादायक बाब म्हणजे या डेअरीने कधीही दूध किंवा लोणी खरेदी केलं नाही. तर मोनोडाइग्लिसराइड्स आणि अॅसिटिक अॅसिड एस्टरचा वापर करीत कृत्रिमपणे तूप तयार केलं आणि हेच तूप तिरुपती मंदिराला पाठविण्यात आलं. आरोपी अजय कुमार सुंगध याच्या अटकेनंतर तपास अधिकाऱ्याला ही माहिती मिळाली. अजय कुमार यानेच हे केमिकल डेअरीला निर्यात केले होते, अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त शेअर केलं आहे.
खोटे रेकॉर्ड अन् सप्लायचा खेळ...
सीबीआयच्या रिपोर्टनुसार, उत्तराखंडच्या भगवानपूरमध्ये असलेल्या या डेअरची संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी भेसळयुक्ती देशी तूपासाठी एक युनिट तयार केली होती. त्यांनी दूध खरेदी केल्याचे खोटे रेकॉर्डही तयार केले होते. २०२२ मध्ये जेव्हा भोले बाबा डेअरली ब्लॅकलिस्ट करण्यात आलं, त्यावेळी या लोकांनी इतर कंपनीच्या नावावर (उदा. वैष्णवी डेअरी (तिरुपती), माल गंगा डेअरी (उत्तर प्रदेश), एआर डेअरी फूड्स (तमिळनाडू)) भेसळयुक्त तूप सप्लाय करीत होते.
नक्की वाचा - Haryana News : पतीच्या मृतदेहाशेजारी बसून पत्नीचा मेकअप; नात्याचं भयाण रुप पाहून शेजारीही हादरले!
धक्कादायक खुलासा...
तपासात असंही आढळून आलंय, जुलै २०२३ मध्ये टीटीडीने नाकारलेले चार टँकर तूप (प्राण्यांची चरबी असलेले) भोले बाबा डेअरीने लेबल बदलल्यानंतर मंदिरात पुन्हा पाठवले होते. जेव्हा एफएसएसएआय आणि सीबीआय पथकाने तामिळनाडूतील दिंडीगुल येथील एआर डेअरी प्लांटला भेट दिली तेव्हा त्यांना आढळलं की, नाकारलेले तूप परत केले गेले नाही तर वैष्णवी डेअरीजवळील स्थानिक दगड क्रशिंग युनिटमध्ये पाठवले गेले. ऑगस्ट २०२४ मध्ये वैष्णवी डेअरीने ते तूप प्रोसेस करीत लेबल बदललं आणि पुन्हा तिरुपती मंदिराला निर्यात केलं. ज्यानंतर तेच तूप भगवान वेंकटेश्वरच्या लाडू प्रसादात वापरण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
