भारतीय रेल्वेच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका धावत्या ट्रेनच्या एसी डब्यात अप्पर बर्थवर बसून एका प्रवाशाने चक्क तेलचा दिवा आणि अगरबत्ती लावून धार्मिक पूजा केली. डब्यात धूर पसरल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून रेल्वे सुरक्षेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
फायर अलार्म अन् आगीचा मोठा धोका
एसी कोच पूर्णपणे बंद असतात. अशा वेळी उघड्या आगीचा वापर करणे रेल्वेच्या नियमांचे थेट उल्लंघन तर आहेच, शिवाय तो हजारो प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. तज्ज्ञांच्या मते, अगरबत्ती आणि दिव्याच्या धुरामुळे एसी डब्यात बसवलेले ऑटोमॅटिक स्मोक डिटेक्टर्स सक्रिय होऊन अचानक इमर्जन्सी ब्रेक लागू शकतात. एसी डब्यातील पडदे, बेडशीट, सीट कव्हर आणि सिंथेटिक साहित्य अत्यंत ज्वलनशील असते. दिव्याची एक छोटीशी ठिणगी किंवा हललेली अगरबत्ती संपूर्ण डब्याला भीषण आगीच्या कचाट्यात सापडू शकते.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)
पाहा VIDEO
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. धार्मिक श्रद्धेचा सर्वांनी आदर केला पाहिजे, परंतु सार्वजनिक सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे बहुतांश लोकांनी म्हटले आहे. ट्रेनमध्ये उघडी आग पेटवणाऱ्या अशा बेजबाबदार प्रवाशांवर कठोर कारवाई करून मोठा दंड आकारावा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
(नक्की वाचा- Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद! काय आहेत पर्यायी मार्ग? या प्रकरणाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाच्या 'Railway Seva' या अधिकृत सोशल मीडिया हँडलने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. रेल्वेने संबंधित युजरकडून ट्रेन क्रमांक, प्रवासाची तारीख, पीएनआर क्रमांक याची माहिती मागवली असून, 'रेल मदत' अॅपद्वारे तात्काळ तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून दोषी प्रवाशावर कायदेशीर कारवाई करता येईल. ट्रेनमध्ये नियम धाब्यावर बसवून असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी धावत्या ट्रेनच्या कोचमध्ये 'हवन' आणि 'रुद्राभिषेक' घातल्याचा प्रकार समोर आला होता. तर काहींनी फर्स्ट एसी डब्याला लग्नाच्या मंडपासारखे सजवल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.'रेल्वे सेवा'ने मागवला पीएनआर तपशील
यापूर्वीही घडले आहेत असे प्रकार