- राजस्थानमधील नागपूर जिल्ह्यातील मायरा ही लग्नातील एक पारंपरिक प्रथा आहे
- नागौरमधील एका लग्नात मामाने आपल्या भाच्याच्या लग्नासाठी १ कोटी ६१ लाख रुपयांचा मायरा दिला
- मायरा मध्ये ८१ लाख रुपये रोख, २५ तोळे सोने, चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता
Wedding Bhaat: सध्या एका लग्नाची चर्चा सोशल मिडियावर जोरदार होत आहे. विशेष म्हणजे या लग्नातल्या एका परंपरेची या निमित्ताने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. राजस्थानच्या नागपूर जिल्ह्यातील 'मायरा' ही परंपरा आहे. मायरा म्हणजे राजस्थान/मारवाडी संस्कृतीतील एक प्रसिद्ध लग्नसमारंभाची प्रथा आहे. ज्यात मामा आपल्या भाची-पुतणीच्या लग्नात भेटवस्तू आणि आर्थिक मदत देतात.नागौरमधील असचं एक लग्न चर्चेत आहे. कारण या लग्नात मायरा म्हणून 1 कोटी 61 लाख रूपये देण्यात आले.
मामाने आपल्या भाच्याच्या लग्नात तब्बल 1 कोटी 61 लाख रुपयांचा 'मायरा' म्हणजेच माहेरचा आहेर देवून एक नवा इतिहास रचला आहे. यामध्ये 81 लाख रुपये रोख आणि 25 तोळे सोन्याचा समावेश आहे. या वर्षातील हा सर्वात मोठा मायरा असल्याचे बोलले जात आहे. राजस्थानच्या संस्कृतीत नात्यांमधील ओलावा आणि परंपरांना विशेष महत्त्व आहे. लग्नाच्या प्रसंगी मामा आपल्या भाचीला किंवा भाच्याला जी भेट देतो, त्याला 'मायरा' म्हटले जाते. ही केवळ एक रित नसून ती प्रतिष्ठा आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते.
नक्की वाचा - Pune News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत लवकरच मेगाभरती, 'या' पदांसाठी प्रक्रिया होणार सुरू
यावेळी महिला पारंपरिक लोकगीते गातात. पूर्वी ही परंपरा मुख्यत्वे जाट समाजात प्रसिद्ध होती, मात्र आता इतर समाजही ही परंपरा उत्साहाने पुढे नेpriority आहेत. जायल येथील रहिवासी ललित व्यास आणि ओमप्रकाश व्यास यांनी आपली बहीण गायत्री यांचा मुलगा निलेश याच्या लग्नात हा विक्रमी मायरा भरला. यामध्ये 81 लाख रुपये रोख, 25 तोळे सोने, चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. स्थानिक लोकांनुसार, ब्राह्मण समाजातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मायरा आहे.
नागौर जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांत 6 ते 7 मोठे मायरे भरले गेले आहेत. सुरुवातीला ही परंपरा जायलच्या जाट समाजाची ओळख होती, परंतु आता सर्वच समाजात ही प्रथा लोकप्रिय होत आहे. कोणी जमीन दान करते, तर कोणी रोख रक्कम आणि सोने देऊन बहिणीचा सन्मान वाढवते.या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सर्वांना या प्रथे बाबत आश्चर्य तर कुठे कौतूक केलं आहे. अशा ही परंपरा आहेत हे अनेकांना या घटनेनंतर पहिल्यांदाच समजले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world