EPFO Auto Settlement: EPFO एक मोठे पाऊल उचलणार आहे. जर तुमचे एखादे जुने PF खाते 'इनअॅक्टिव्ह असेल, तर आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी EPFO कार्यालयामध्ये चकरा मारण्याची आवश्यकता नाही. EPFO ऑटोमेटेड सेटलमेंट सिस्टम आणत आहे. या अंतर्गत सुमारे 5,200 कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम थेट तुमच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात पाठवली जाईल. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, आपल्या इनअॅक्टिव्ह (बंद पडलेल्या) खात्यांमध्ये जमा असलेला दावा न केलेला निधी क्लिअर करण्यासाठी एक मोठी योजना आखत आहे. IANSने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, EPFO एक 'ऑटोमेटेड सेटलमेंट सिस्टम' सुरू करण्याच्या तयारीत आहे, ज्या अंतर्गत PFचे पैसे थेट सदस्याच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात पाठवले जातील.
क्लेम न करताच मिळणार तुमचा अडकलेला पैसा
या नवीन प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी वेगळा क्लेम फॉर्म भरण्याची गरज लागणार नाही. पहिल्या टप्प्यात आधार-व्हेरिफाइड असलेल्या सुमारे 25 टक्के इनअॅक्टिव्ह खात्यांवर प्रक्रिया केली जाऊ शकते. एकूण रकमेचा विचार केल्यास या उपक्रमातून सुमारे 8 लाख आधार-व्हेरिफाइड खाती कव्हर केली जातील, ज्यामध्ये सुमारे 5,200 कोटी रुपये जमा आहेत. एकूण खात्यांचा विचार केल्यास फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, EPFO कडे सुमारे 31 लाख इनअॅक्टिव्ह खाती आहेत, ज्यामध्ये एकूण 10,181 कोटी रुपये जमा आहेत.
(नक्की वाचा: नोकरदारांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार सॅलरी स्ट्रक्चर; पगारावर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर)
14,000 अशी खाती ज्यांना 5 लाखांहून अधिक रक्कम मिळतील
सुमारे 14,000 खाती अशी आहेत ज्यात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे, तर 38,000 खात्यांमध्ये 1 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान रक्कम जमा आहे. यापूर्वी 'सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टिज्' ने 1,000 रुपयांपर्यंत बाकी असलेल्या इनअॅक्टिव्ह खात्यांच्या ऑटो-सेटलमेंटला मंजुरी दिली आहे.
(नक्की वाचा: ATM New Rules: 1 एप्रिलपासून ATM नियमांमध्ये मोठे बदल, QR कोडची नवी पद्धत, बजेटवर होणार परिणाम? जाणून घ्या लिमिट, नवे नियम)
साधारणपणे जेव्हा एखादा कर्मचारी वयाच्या 55व्या वर्षी निवृत्त होतो आणि सलग तीन वर्षे कोणतेही अंशदान (Contribution) करत नाही, तेव्हा त्याचे खाते इनअॅक्टिव्ह मानले जाते आणि त्यावर व्याज मिळणे बंद होते. पण 55 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सदस्यांच्या बाबतीत, वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळत राहते.
Photo Credit: NDTV Marathi
PF डिपॉझिटवर मिळणार 8.25% व्याजEPFO ने वर्ष 2025-26 साठी पीएफ जमा रकमेवर 8.25 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. पण लक्षात ठेवा की, जर एखादे खाते 36 महिन्यांपर्यंत इनअॅक्टिव्ह राहिले, तर त्याला 'डोरमेंट' (सुप्त) मानले जाते आणि त्यावर पुढे कोणतेही व्याज दिले जात नाही.