
Family Committed suicide due to debt : कर्ज आणि आर्थिक चणचणीमुळे एखादी व्यक्ती काय पाऊल उचलेल याचा अंदाज लावता येऊ शकत नाही. जेव्हा पैसे चुकविण्याची वेळ जवळ येते, त्यावेळी इतर सर्व गोष्टी खूप सोप्या वाटू लागलात. इतका की मृत्यूही सहज वाटायला लागतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील शाहजहापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. येथे आर्थिक चणचण आणि कर्जबाजारीपणातून एक व्यापारी दाम्पत्याने स्वत:चा जीव ङेतला आणि सोबतच आपल्या चार वर्षांच्या मुलाचाही जीव घेतला. त्यांनी मुलाला विषारी पदार्थ खायला दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली.
कार-घर विकून कर्ज फेडा...
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइट नोट सापडली आहे. ज्यामध्ये मृत व्यक्तीने लिहिलंय, माझ्यावर खूप कर्ज झालंय, त्यामुळे मी खूप त्रस्त आहे. मी अनेकांकडून कर्ज घेतलंय. मात्र काहीच उत्पन्न मिळत नाही. अशात मी मानसिकदृष्ट्या खूप त्रासलोय. सुसाइड नोटमध्ये लिहिलं, माझी नातेवाईकांविरोधात काहीच तक्रार नाही. सर्वांनी मला साथ दिली. आमचं घर, कार आणि इतर काही गोष्टी विकून कर्ज फेडा.
नक्की वाचा - Virar Building Collapse : माय-लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता, मुलीच्या वाढदिवशीच कुटुंबावर काळाचा घाला
पत्नी आणि मुलासह आत्महत्या
पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितलं की, ठाणे रोजा येथील वसाहतीत राहणारा हातमाग व्यापारी सचिन ग्रोव्हर (30), त्यांची 28 वर्षीय पत्नी शिवानी आणि 4 वर्षीय मुलगा फतेह यांचे मृतदेह घरात आढळले. या जोडप्याने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली, तर फतेहचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळला.
कर्जामुळे त्रस्त होऊन केली आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याने प्रथम त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला काही विषारी पदार्थ खायला दिलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेतला. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृताचे कुटुंब घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. तर मृताचे कुटुंब खाली राहतं. बुधवारी सकाळी कुटुंब वरच्या मजल्यावर गेले तेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
मृत सचिन ग्रोव्हरच्या आईने सांगितले की, सचिनने काल संध्याकाळी तिला सांगितलं होतं की, त्याला 5 लाख रुपये बँकेत जमा करायचे आहेत आणि तीन लाख रुपयांची सोय करण्यात आली आहे. मात्र रात्रीतून तिघांच्या मृत्यूने आईला जबर धक्का बसला आहे. तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world