
UPSC New Portal : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ऑनलाइन माध्यमातून नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे. यूपीएससी ऑनलाइन अर्जाच्या पोर्टलचे चार भाग असून, होम पेजवर 4 स्वतंत्र कार्डमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी खाते उघडणे, सार्वत्रिक नोंदणी आणि कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म हे तीन विभाग सर्व परीक्षांसाठी समान असून, ते उमेदवारांना केव्हाही भरता येतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चौथा परीक्षा विभाग, या ठिकाणी परीक्षेची सूचना, परीक्षा अर्ज आणि अर्जाची स्थिती पाहता येईल. परीक्षेच्या अधिसूचनेत दिलेल्या कालावधीत उमेदवारांनी या भागामध्ये केवळ परीक्षेशी संबंधित माहिती भरायची आहे.
या व्यवस्थेमुळे उमेदवारांना पहिले तीन भाग केव्हाही भरता येतील, आणि आवश्यकतेनुसार सूचना जारी करण्यात आल्यावर कोणत्याही यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरता येईल, जेणेकरून वेळेची बचत होईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गडबड टाळता येईल.
(नक्की वाचा- IAS Inquiry : बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे 'बाबू' बनले, 11 IAS अधिकाऱ्यांसह 15 बड्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू)
सर्व अर्जदारांनी https://upsconline.nic.in. या वेबसाइटवर नव्याने अर्ज भरून पोर्टलमध्ये आपली कागदपत्रे करावी लागणार आहेत. यापुढे जुने वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) मॉड्यूल लागू होणार नाही. उमेदवारांना अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी होम पेजवर तसेच सर्व प्रोफाइल / मॉड्यूलवर तपशीलवार सूचना उपलब्ध आहेत.
अर्जदारांना युनिव्हर्सल अॅप्लिकेशनमध्ये त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र दस्तऐवज म्हणून वापरण्याची सूचना देण्यात येत आहे, जेणेकरून ओळखपत्र आणि इतर तपशीलांची सहज आणि सुलभ पडताळणी आणि प्रमाणीकरण करता येईल, आणि त्यानंतर ते सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी आणि सामान्य रेकॉर्ड (दस्त ऐवज) म्हणून काम करेल.
(नक्की वाचा- ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड)
नवीन ऍप्लिकेशन पोर्टल 28 मे 2025 पासून सुरू करण्यात आले आहे. 28 मे 2025 रोजी अधिसूचित होणाऱ्या सीडीएस परीक्षा-II, 2025 आणि एनडीए आणि एनए-II, 2025 साठीचे अर्ज नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे स्वीकारले जातील.
उमेदवारांचा वेळ वाचणार
नवीन पोर्टल उमेदवारांना वेळ वाचवण्यास आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यास मदत करेल. अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सविस्तर सूचना होम पेजवर आणि सर्व प्रोफाइल, मॉड्यूलमध्ये उपलब्ध आहेत, जे उमेदवारांना मार्गदर्शन करती