- समस्तीपुर जिले के राजाजान गांव के अभिषेक चौहान ने UPSC परीक्षा में 102वीं रैंक प्राप्त कर जिले का मान बढ़ाया
- अभिषेक चौहान ने पहली बार प्रयास में ही UPSC की प्री, मेंस और इंटरव्यू परीक्षा सफलतापूर्वक क्रैक की है
- अभिषेक का भांजा भारतीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी है, जिससे परिवार और जिले में खुशी का माहौल है
भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्या यशानंतर आता त्याचे मामा अभिषेक चौहान यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश संपादन केले आहे. अभिषेक चौहान यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेत 102 वी रँक मिळवली आहे. विशेष म्हणजे अभिषेक यांनी हे कठीण यश आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिळवले असून ते आता आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याची शक्यता आहे.
भाच्यानंतर आता मामाचं यश
काही दिवसांपूर्वी समस्तीपूरचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता त्याचा सख्खा मामा अभिषेक चौहान याने प्रशासकीय सेवेत यश मिळवून 'समस्तीपूर पॅटर्न' सिद्ध केला आहे. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या मेहुण्याच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
बालपणापासूनच होते हुशार
अभिषेक चौहान यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1999 रोजी झाला असून ते शिक्षणात हुशार होते. हाजीपूरच्या अक्षरा स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सैनिक स्कूल आणि आरके मिशन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण केल्या होत्या. अभिषेक यांनी एम.टेक. (M.Tech) मध्ये सुवर्णपदक पटकावून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. 2022 नंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या तयारीला सुरुवात केली आणि अवघ्या 3 वर्षांत यश मिळवले.
पहिल्याच प्रयत्नात यश
2025 मध्ये अभिषेक यांनी पहिल्यांदाच यूपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा दिली. त्यानंतर 2026 मध्ये झालेली मुलाखत देखील पास केली. अभिषेक यांचे वडील डॉ. अभय कुमार सिंह हे नालंदा खुल्या विद्यापीठाचे कुलसचिव आहेत.