Crude oil price drop : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली असून, लवकरच देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या तणावात दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर केल्याने ऊर्जा बाजारातील अस्थिरता कमी झाली आहे.
कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाली असून त्यामुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून त्यांचे दर 15 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले. तर तणावानंतर, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरली आहे.
US-Iran War Update: अमेरिका-इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम; दोन्ही देशांमध्ये नेमकं काय ठरलं?
ट्रम्प यांच्या या सकारात्मक पुढाकारामुळे 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' (WTI) क्रूड प्रति बॅरल ९५ डॉलर्सवर पोहोचले आहे. जगाच्या एकूण खनिज तेल पुरवठ्यापैकी २० टक्के वाटा असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक आता सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. जरी आज ८ एप्रिल रोजी मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले, तरी विश्लेषकांच्या मते, जर कच्च्या तेलाचे दर ९५ डॉलर्सच्या खाली टिकून राहिले, तर तेल कंपन्या लवकरच दर कपातीची घोषणा करू शकतात. ७ ते १० दिवसांच्या तांत्रिक प्रक्रियेनंतर ग्राहकांना ही सवलत मिळण्याची आशा आहे.
पेट्रोल- डिझेलचे दर कमी का झाले नाहीत?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी झाल्या नाहीत, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. खरे तर, जागतिक किमतीतील घसरणीचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल पंपांवर दिसण्यासाठी साधारणपणे ७-१० दिवस लागतात. बाजार विश्लेषकांच्या मते, जर कच्च्या तेलाची किंमत दीर्घकाळ ९५ डॉलरच्या खाली राहिली, तर सरकारी तेल कंपन्या लवकरच सर्वसामान्यांसाठी दरकपातीची घोषणा करू शकतात.
नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world