- US President Trump agreed to a two-week ceasefire with Iran
- Trump said ceasefire was "subject to Iran agreeing to reopen Hormuz immediately"
- Trump said the US would use the ceasefire period to work towards a final peace agreement
US-Iran War Update: अमेरिका-इराण युद्धाला अखेर 2 आठवड्यांचा युद्धविराम मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या अवघ्या काही तास आधीच त्यांनी युद्धाबाबत मोठा 'यू-टर्न' घेतला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी 2 आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर (Ceasefire) शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आखाती देशांमधील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांचा 'ट्रुथ सोशल'वरून मोठा खुलासा
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती देताना सांगितले की, त्यांनी पाकिस्तानने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका या 2 आठवड्यांच्या कालावधीचा वापर इराणसोबत कायमस्वरूपी शांतता करार करण्यासाठी करेल. "आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत आणि आम्ही इराणसोबत मोठ्या शांतता कराराच्या अगदी जवळ आहोत," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, वॉशिंग्टनला तेहरानकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे आणि वाटाघाटी सुरू करण्यासाठी तो एक चांगला आधार आहे. पुढे ट्रम्प यांनी असंही सांगितले की, जर इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे पुन्हा उघडण्यास सहमती दर्शवली तरच युद्धविराम होईल.
(नक्की वाचा- Oil India: इंधन संकटादरम्यान राजस्थानातून गुड न्यूज! वाळवंटातून निघालं 'काळं सोनं)
इराणची भूमिका आणि अटी
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील या युद्धविरामाला दुजोरा दिला आहे. इराणने होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) 2 आठवड्यांसाठी सुरक्षित प्रवासासाठी खुली करण्याचे मान्य केले आहे. अराघची यांनी म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी सुरक्षित वाहतूक शक्य होईल, परंतु यासाठी इराणी सशस्त्र दलांशी समन्वय साधावा लागेल आणि काही तांत्रिक मर्यादांचाही विचार करावा लागेल. जर अमेरिकेने इराणवर होणारे हल्ले थांबवले, तरच इराणचे सशस्त्र दल आपली संरक्षण कारवाई थांबवेल, असंही त्यांनी नमूद केलं.
इराणने आधीच स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायल पुढील हल्ले करणार नाहीत याची हमी देणाऱ्या संपूर्ण शांतता कराराचा भाग म्हणून ते होर्मुझची सामुद्रधुनी उघडेल. केवळ तात्पुरत्या युद्धविरामाच्या बदल्यात ती उघडण्यास ते तयार नव्हते.
Statement on behalf of the Supreme National Security Council of the Islamic Republic of Iran: pic.twitter.com/cEtBNCLnWT
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 7, 2026
(नक्की वाचा- Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम')
चीनच्या हस्तक्षेपानंतर इराणने प्रस्ताव स्वीकारला
'न्यू यॉर्क टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, इराणचा मित्र देश असलेल्या चीनच्या हस्तक्षेपानंतर इराणने या प्रस्तावावर लवचिकता दाखवली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने तीन इराणी अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, चीनने शेवटच्या क्षणी केलेल्या हस्तक्षेपानंतर इराणने पाकिस्तानचा दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. इराणचा प्रमुख मित्र असलेल्या चीनने तेहरानला लवचिकता दाखवून तणाव कमी करण्याचे आवाहन केले होते. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, या शस्त्रसंधीला इराणचे नवीन सर्वोच्च नेते, अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी मंजुरी दिली आहे.
'यू-टर्न' आणि 10 मुद्द्यांचा प्रस्ताव
विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी आधी इराणचे वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. मात्र, इराणकडून मिळालेल्या 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर आता सकारात्मक चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world