जाहिरात

US-Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन! 40 मिनिटे एकमेकांशी बोलले, चर्चा काय झाली?

इस्लामाबादमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

US-Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन! 40 मिनिटे एकमेकांशी बोलले, चर्चा काय झाली?
  • इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता वार्ता यशस्वी झाली नाही
  • दोन्ही नेत्यांनी होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्यावर भर देऊन जागतिक तणाव कमी करण्यावर चर्चा केली
  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून भारताची मध्यस्थी महत्त्वाची ठरू शकते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता वार्ता यशस्वी होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. इराण युद्धाच्या काळात ट्रम्प यांनी मोदींना फोन करण्याची ही दुसरी वेळ आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारताची मध्यस्थी या वादात महत्त्वाची ठरू शकते, असे संकेत अमेरिकेने दिले आहेत.

या संवादादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सांगितले की, "भारतातील जनता आपल्यावर प्रेम करते." भारतात नियुक्त अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी या संवादाची अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुढील महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - RTO News: आता रिक्षावाल्यांना मराठी बोलावेच लागणार! नाही तर..., परिवहन विभागाच्या निर्णयाने धाबे दणाणले

पंतप्रधान मोदींनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत या चर्चेची माहिती दिली. मोदी म्हणाले की, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोन आला होता. आम्ही विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला. तसेच पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीवर चर्चा केली. 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सुरक्षित आणि व्यापारासाठी खुली ठेवणे किती महत्त्वाचे आहे, यावर आम्ही दोघांनी एकमत व्यक्त केले."

नक्की वाचा - Pune News: 3 मित्र, 20 देश, 75 दिवस अन् 16 हजार किमीचा प्रवास, पुणे ते लंडन बाय रोड! एक गोष्ट थक्क करणारी

राजदूत सर्जियो गोर यांनी स्पष्ट केले की, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प नियमितपणे पंतप्रधान मोदींना अपडेट देत असतात. शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना गोर म्हणाले, "जगातील कोणताही देश शांतता प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो आणि ट्रम्प अशा प्रयत्नांचे स्वागतच करतात." त्यांनी पुढे नमूद केले की, होर्मुजची सामुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय जलसीमा असून, कोणत्याही एका देशाला ती रोखून धरण्याचा अधिकार नाही. इस्लामाबादमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com