Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात नात्यांचा चुराडा होईल, अशी एक घटना समोर आली आहे. एक महिला लग्नाआधीच होणाऱ्या जावयासोबत पळून गेली आहे. अलीगडच्या मडराक परिसरातील ही घटना आहे. सासू सोबत अडीच लाख रुपये घेऊन पळून गेली. याप्रकरणी नातेवाईकांना गुन्हा दाखल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
16 एप्रिल रोजी होणाऱ्या लग्नाच्या फक्त नऊ दिवस आधी, मुलीची आई तिच्या होणार्या जावयासह पळून गेली. 2 एप्रिल रोजी लग्न ठरलेल्या मुलगा आणि मुलीचा साखरपुडा पार पडला होता. 3 एप्रिल रोजी कुटुंबियांनी जावयाला एक मोबाईल भेट दिला होता. मात्र त्यानंतर 6 एप्रिल रोजी दोघेही घरातून बेपत्ता झाले.
मीडिया रिपोर्ट्स आणि कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर लगेचच सासू आणि जावई यांच्यातील संवाद वाढू लागला. त्यानंतर दोघेही एकमेकांशी गुपचूप बोलू लागले. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणावर सांगितले की, दोघे फोनवर सतत बोलत होते. त्यांतर ते अचानक गायब झाले. सोबत घरातून रोख रक्कम आणि दागिने देखील गायब झाले. दोघे अचानक पळून गेले नाही तर हे संपूर्ण प्रकरण कट रचल्यासारखे वाटते आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी ही महिला तिच्या जावयासह पळून गेली. लग्न 16 एप्रिल 2025 रोजी होणार होते. पळून जाताना महिलेने तिच्यासोबत अडीच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने नेले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग आणि कुटुंब आणि ग्रामस्थांच्या चौकशीद्वारे दोघांचा शोध घेत आहेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की हे केवळ प्रेम प्रकरण नसून पूर्वनियोजित कट आहे.