जाहिरात

Pandharpur News: शौचालय साफ करणाऱ्या महिलेला लॉटरी, एका फटक्यात लखपती, पुढचा प्लॅनही ठरला

त्यामुळे सहज म्हणून त्यांनी ती लॉटरी खरेदी केली. ही लॉटरी आपल्याला लागेल हे त्यांच्या मनीध्यानीही नव्हते.

Pandharpur News: शौचालय साफ करणाऱ्या महिलेला लॉटरी, एका फटक्यात लखपती, पुढचा प्लॅनही ठरला
सोलापूर:

संकेत कुलकर्णी 

घरात अठराविश्व दारिद्र. नशिबी वर्षोनं वर्ष शौचालय साफ करण्याचं काम. त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह. राहण्यासाठी दहा बाय दहाचं पत्र्याचं घर. ही स्थिती आहे पंढरपूरमध्ये राहाणाऱ्या मनीषा वाघेला यांची. पण त्याचं आता नशिब पालटलं आहे. त्यांना पंढरपूरचा विठ्ठल पावला आहे. त्या एका फटक्यात लखपती बनल्या आहेत. लखपती झाल्यानंतर मनीषा यांनी ही त्या पैशांचं आता काय करणार याचा प्लॅनही ठरवला आहे. त्यांना लागलेल्या या लॉटरी मागची गोष्ट ही मोठी रंजक आहे. त्याचीच चर्चा सध्या पंढरपूरात जोरदार पणे सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनीषा वाघेला या पंढपूरच्या आहेत. पंढरपुरात मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहाचे त्यांचे पत्र्याचे घर आहे. त्या स्वच्छतेची काम करून आपल्या  कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपण कधी लखपती बनू हे त्यांनी स्वप्नातही पाहीले नव्हते. पण त्यांचे नशिब फळफळले. एक दिवस त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या‌. यावेळी त्यांची नजर तिथे लॉटरी विकत असलेल्या व्यक्ती कडे गेली. लॉटरीची किंमत 50 रुपये होते. 

ट्रेंडिंग बातमी - viral video: डोंबिवलीत Excuse me बोलण्यावरून जोरदार राडा, 2 तरुणींना भर रस्त्यात मारहाण

त्यामुळे सहज म्हणून त्यांनी ती लॉटरी खरेदी केली. ही लॉटरी आपल्याला लागेल हे त्यांच्या मनीध्यानीही नव्हते. पण ज्यावेळी त्यांना समजले की आपल्याला लॉटरी लागली त्यावेळी त्या प्रचंड आनंदी झाल्या. त्या एका क्षणात लखपती झाल्या. त्यांना तब्बल 21 लाखांची लॉटरी लागली.  पांडुरंग पावला ही त्यांची लॉटरी लागल्यानंतरची पहिली प्रतिक्रीया होती. ऐवढे पैसे कधी आपल्या आयुष्यात येतील असं त्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण ते प्रत्यक्षात आलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray: लोकसभेत राज ठाकरेंचा विषय, हिंदी भाषिक खासदार आक्रमक, वाद पेटणार?

आता या पैशांचे काय करायचे याचाही प्लॅन मनीषा यांनी केला आहे. संघर्ष आणि मेहनत ही आतापर्यंत करत आला आहोते. आता या पैशांचा चांगल्या कामासाठी वापर करायचा असं त्यांनी ठरवलं आहे. त्या आधी कुटुंबासाठी चांगलं पक्क घर घेणार आहेत. आतापर्यंत पत्र्याच्या घरात होतो पण पुढे तसं नसेल असंही त्या म्हणाल्या. मुलांनी चांगले शिक्षण द्यायचे आहेत. ते शिकले तर ते आणखी मोठे होतील. आम्ही जी कामं करत आहोत ती त्यांना करावी लागणार नाहीत, अशा भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.