उत्तर प्रदेशच्या गोंडा येथे रेल्वे रुळावरुन घसरल्याची घटना समोर आली आहे. चंदिगडहून दिब्रुगड येथे ही एक्सप्रेस निघाली होती. एक्सप्रेसचे चार वातानुकूलित डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती आहे. चंदिगड-दिब्रुगड एक्सप्रेसचे 3 एसी डब्ब्यांसह एकूण 15 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. आतापर्यंत 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण 20 हून अधिक प्रवाशी जखमी आहेत.
गोंडापासून 30 किलोमीटर अंतरावर झिलाही रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. बचाव पथक गोंडा येथे दाखल झालं असून बचावकार्य सुरु केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ मदतकार्य सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले
या गाड्यांचे मार्ग बदलले
-12557 सप्त क्रांति एक्सप्रेस
-12553 सहरसा-नवी दिल्ली वैशाली एक्सप्रेस
-13019 हावडा-काठगोदाम बाघ एक्सप्रेस
-15273 रक्सोल-आनंद विहार सत्याग्रह एक्सप्रेस
-12565 दरभंगा-नई दिल्ली बिहार संपर्क क्रांति एक्सप्रेस
-12555 गोरखपूर-भटिंडा गोरखधाम एक्सप्रेस
-15707 कटिहार-अमृतसर आम्रपाली एक्सप्रेस
-15653 गुवाहाटी जम्मू तवी अमरनाथ एक्सप्रेस
-14673 जयनगर अमृतसर शहीद एक्सप्रेस