Uttarakhand Bus Accident : उत्तरखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 36 जणांचा मृत्यू

बसमध्ये 45 हून अधिक प्रवासी होते. अपघातानंतर काही प्रवाशांना बसमधून उड्या मारल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी आपोआप बसमधून बाहेर फेकले गेले.

जाहिरात
Read Time: 1 min

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे मार्चुलाजवळ बस दरीत कोसळली आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नयनी दांडा येथून रामनगरकडे जाणारी बस आज सकाळी दरीत कोसळली. बस सारड बँडजवळ नदीत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 36 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. 

बसमध्ये 45 हून अधिक प्रवासी होते. अपघातानंतर काही प्रवाशांना बसमधून उड्या मारल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी आपोआप बसमधून बाहेर फेकले गेले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांचं ट्वीट

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्वीट करत म्हटलं की, अल्मोडा जिल्ह्यातील मार्चुला येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत अत्यंत दु:खद बातमी मिळाली. जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि SDRF टीम जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्याचे काम त्वरीत करत आहेत. गरज भासल्यास गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Topics mentioned in this article