Vande Bharat Train: 'वंदे भारत' निर्माते सुधांशू मणी यांचा पहिल्यांदाच प्रवास, 'या' त्रुटींवर ठेवलं बोट

देशाला पहिली स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेन देणाऱ्या या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे सुधांशू मणीयांना 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच या गाडीतून प्रवासी म्हणून प्रवास करण्याची संधी मिळाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
In 2018, Mani travelled in the test run of the prototype Train 18.

Vande Bharat Train: पंतlप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. देशाला पहिली स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेन देणाऱ्या या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे सुधांशू मणीयांना 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच या गाडीतून प्रवासी म्हणून प्रवास करण्याची संधी मिळाली. आयसीएफ चेन्नई येथील *महाव्यवस्थापक पदावरून 31 डिसेंबर 2018 रोजी निवृत्त झालेल्या मणी यांनी त्यांचा अनुभव एका ब्लॉग पोस्टमध्ये  शेअर केला आहे.

लखनौच्या चारबाग स्टेशनवरून प्रयागराजसाठी वंदे भारतमध्ये बसलेल्या मणी यांचा अनुभव मिश्र होता. गाडीचे बाह्य स्वरूप त्यांनी बांधल्याप्रमाणेच चांगले दिसत होते. साइडवॉलवर थोडीशी वेव्ह असली तरी, ती इतर भारतीय ट्रेन्सपेक्षा उत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

एक्झिक्युटिव्ह क्लास कोच  स्वच्छ होता. सीट्स अधिक आरामदायक असल्याचे त्यांनी सांगितले. स्लाइड-फॉरवर्ड सिस्टमऐवजी आता बॅक-रिक्लाईन  यंत्रणा वापरली आहे. आतील भाग 'आकर्षक' आणि खाद्यपदार्थ 'स्वच्छ आणि रुचकर' असल्याचे मणी यांनी कौतुक केले.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

या त्रुटींवर ठेवलं बोट

सुधांशू मणी यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधील काही त्रुटींवरही बोट ठेवले.

  • कमी प्रवासी संख्या: मणी यांनी प्रवास केलेल्या गाडीत प्रवाशांची संख्या अत्यंत कमी होती. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 25 टक्क्यांहून कमी, तर चेअर कारमध्ये अर्धीच क्षमता भरली होती.
  • स्लीपरची गरज: आम्ही खूप पूर्वीच भाकीत केले होते की स्लीपर मॉडेलशिवाय, हा 'डे-ट्रेन' प्रकार अशा मार्गांवर संघर्ष करेल. यामुळे त्यांनी स्लीपर वंदे भारत लवकरात लवकर सुरू करण्याची गरज व्यक्त केली.
  • अनावश्यक रेड कार्पेट: कोचच्या फ्लोअरवर 'अनावश्यक लाल कार्पेटची पट्टी' टाकल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
  • टॉयलेटमध्ये कॉस्ट कटिंग: टॉयलेटमधील फिटिंग्जवर 'कॉस्ट कटिंगचे' आणि 'मल्टी-सोर्सिंग'चे ठसे दिसतात, जे रेल्वेच्या खरेदी सिस्टमचा एक 'शाप'  आहे, असे मणी म्हणाले.
  • कमी वेगाने धावणे: 160 किमी प्रति तास स्पीडची क्षमता असतानाही, रेल्वे मंत्रालयाकडून गाडी केवळ 130 किमी प्रति तास या सध्याच्या परवानगीयोग्य वेगाने चालवली जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Topics mentioned in this article