भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) आधुनिकीकरणाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. प्रवाशांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत, देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन (Vande Bharat Sleeper Train)याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 च्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. (New Train Launch 2026) राजधानी दिल्ली ते कोलकाता (हावडा) (Delhi Kolkata Route) या देशातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या मार्गावर ही ट्रेन धावण्याची शक्यता आहे. या ट्रेनचा रुट कोणता असणार, याबाबत अद्याप अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. (Railway News Marathi) ही अत्यंत आरामदायक आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त ट्रेन असल्याने या ट्रेनबाबत प्रवाशांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. दिल्ली-कोलकाता मार्गावर ही ट्रेन सुरू झाल्यास ती पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेली एक मोठी 'विकास भेट' ठरेल असे बोलले जात आहे.
नक्की वाचा: वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलिंडर 111 रुपयांनी महागला, जाणून घ्या नवी किंमत
देशातील सगळ्यात वेगवान ट्रेन
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या ट्रेनच्या हाय-स्पीड ट्रायलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजस्थानमधील कोटा-नागदा विभागामध्ये चाचणी घेण्यात आली होती. चाचणीदरम्यान ही ट्रेन 180 kmph या वेगाने धावली. 'कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी' (CRS) कडून या ट्रेनची अंतिम चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान एक विशेष प्रयोग करण्यात आला, ज्याला 'स्टॅबिलिटी टेस्ट' किंवा 'वॉटर ग्लास टेस्ट' म्हटले जाते. वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये पाण्याने पूर्ण भरलेले ग्लास ठेवले होते, 180 kmph वेगाने धावत असतानाही या ग्लासमधील पाण्याचा एक थेंबही सांडला नाही. ज्यावरून ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. या चाचणीमुळे ट्रेनची स्थिरता, प्रगत सस्पेन्शन आणि हायटेक डिझाइनची खात्री पटली आहे.
नक्की वाचा: नववर्षाच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी! मुंबईत जोरदार पाऊस, कुठे कुठे सरी बरसल्या?
ट्रेनमध्ये गरम पाण्याच्या शॉवरचीही सुविधा
दिल्ली ते कोलकाता हे सुमारे 1449 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही किमान 2 ते 3 तास कमी वेळेत पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. ही ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित (Self-propelled) असून याला वेगळ्या इंजिनची गरज नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील. यात 11 डबे एसी 3-टायर, 4 डबे एसी 2-टायर आणि 1 डबा अत्यंत आलिशान अशा 'फर्स्ट क्लास एसी'चा असणार आहे. एकूण 1128 प्रवासी एकावेळी यातून प्रवास करू शकतील. प्रवाशांच्या आरामासाठी मऊसूत गाद्या, प्रत्येक बर्थवर मोबाइल चार्जिंग पॉईंट, प्रत्येक प्रवाशाला अंधारात वाचता यावे यासाठी वेगळे लाईट आणि गरम पाण्याचे शॉवर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.