जाहिरात

Mumbai Rain: नववर्षाच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी! मुंबईत जोरदार पाऊस, कुठे कुठे सरी बरसल्या?

नवीन वर्षाची पहाट होत असतानाच मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री केल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.

Mumbai Rain: नववर्षाच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी! मुंबईत जोरदार पाऊस, कुठे कुठे सरी बरसल्या?

Mumbai Heavy Rain News:  आज नववर्षाचा पहिला दिवस.. देशभरात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे.  सर्वत्र नववर्षाचे जंगी सेलिब्रेशन सुरु असतानाच मुंबईमध्ये पहिल्याच दिवशी पहाटे पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई उपनगरात, वाशी नवी मुंबईमध्ये पहाटे पावसाला सुरुवात झाली. तसेच मुंबईमध्ये घाटकोपर, साकीनाका, कुर्ला, बीकेसी परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या... ऐन हिवाळ्यात, नववर्षाच्या स्वागताला पावसाने हजेरी लावल्याने सकाळ सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Happy New Year 2026 Wishes And Quotes: सकारात्मक ऊर्जा, खरी नाती आणि सुखद क्षण वाढो, नववर्ष 2026च्या शुभेच्छा

मुंबईत पावसाची हजेरी...

कॅलेंडरचे पान बदलले आणि २०२६ या नवीन वर्षाचे आगमन झाले. देशभरात हे स्वागत उत्साहात होत असताना निसर्गाने मात्र मुंबईकरांना सुखद पण तितकाच गोंधळात टाकणारा धक्का दिला. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची पहाट होत असतानाच मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री केल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.

​मध्यरात्रीपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. पहाटेच्या सुमारास वाशी, नवी मुंबईसह घाटकोपर, साकीनाका, कुर्ला आणि बीकेसी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच मुंबईच्या पश्चिम उपनगरसह बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी भागात  पहाटे बरसल्या पावसाच्या सरी बरसल्या.  अचानक आलेल्या पावसामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची यामुळे मोठी तारांबळ उडाली. हिवाळ्यातील हा अवकाळी पाऊस मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

पुण्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत..! 

​दरम्य़ान, पुण्यात नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (FC) रोडवर तरुणाईचा महापूर लोटला होता. 'हॅप्पी न्यू इयर'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तसेच मुंबईच्या दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. मुंबईकरांनी अथांग समुद्रकिनाऱ्याच्या साक्षीने आणि फटाक्यांच्या रोषणाईत नवीन वर्षाचे स्वागत केले. पावसाच्या शिडकाव्यामुळे पहाटेच्या थंडीत अधिकच भर पडली असली, तरी उत्साहात कोणतीही कमतरता जाणवली नाही.

BMC Election 2026 : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपाची 'फिल्डिंग'; 137 उमेदवार रिंगणात, वाचा तुमचा उमेदवार कोण?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com