2 hours ago

भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण असतील याचा निर्णय आज मंगळवार 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आज देशाचे आगामी उपराष्ट्रपती यांच्या निवडीसाठी मतदान करतील. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून सीपी साधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी उमेदवार आहेत. निवडणूक झाल्यानंतर निकाल मंगळवारी सायंकाळपर्यंत घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. 

Sep 09, 2025 21:20 (IST)

Live Update: काळू नदीत दोन बहिणी बुडाल्या

टिटवाळाजवळ काळू नदीवर दोन बहिणी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीच्या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. अलिया अन्सारी ( १८) आणि सना अन्सारी (८) अशा या दोघींची नावे आहेत. त्या मांडा टिटवाळा परिसरातील वासुंद्री रोड नजीक गणेशनगरात राहत होत्या. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीने नदीपात्रात दोघा बहिणींच्या मृतदेहाचा शोध सुरु केला. अथक प्रयत्नानंतर अलिया हिचा मृतदेह हाती लागला, तर सना हिचा मृतदेहाचा शोध अद्याप सुरु आहे.

Sep 09, 2025 18:12 (IST)

Live Update : आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी

आयुष कोमकर हत्या प्रकरण

आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील ६ ही आरोपींना १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

सर्व ६ आरोपींना १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या ६ आरोपींना १५ सप्टेंबर पर्यंत ची पोलीस कोठडी

Sep 09, 2025 17:58 (IST)

Live Update : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान पूर्ण, काही वेळात निकाल येणार

Live Update : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं आहे. काही वेळात निकाल येण्याची आपेक्षा आहे. एनडीएकडून सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

Sep 09, 2025 17:12 (IST)

आयुष कोमकर हत्या प्रकरण, आरोपींना कोर्टात केलं हजर

आयुष कोमकर हत्या प्रकरण 

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील ६ आरोपींना पुणे पोलीस कोर्टात करण्यात आल हजर 

काल रात्री अटक केल्यानंतर आज ६ आरोपींना कोर्टात करण्यात आलं हजर 

अमन पठाण ,सुजल मेरगु 

,बंडू आंदेकर ,स्वराज वाडेकर 

,तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर

या सहा आरोपींना कोर्टात करण्यात आल हजर

Advertisement
Sep 09, 2025 17:10 (IST)

Live Update: मालेगाव स्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मालेगाव स्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाच्या  निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान 

३१ जुलैला विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव स्फोटा प्रकरणातील सगळ्या सातही आरोपींची मुक्तता केली होती 

स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी दिलं निकालालाल आव्हान 

१५ सप्टेंबरला होणार सुनावणी 

२९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते

Sep 09, 2025 17:09 (IST)

Live Update: ओबीसी मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक

- ओबीसी मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक

- ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

- ओबीसी नेत्यांसह ओबीसी महासंघाचे शिष्टमंडळ देखील हजर राहणार

- थोड्याच वेळात बैठकीला होणार सुरुवात

Advertisement
Sep 09, 2025 17:03 (IST)

Live Update: शाळेत शिक्षक न आल्याने पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

वाशिमच्या जांभरूण महाली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शिक्षकच न आल्यानं पालकांनी संतप्त होत विद्यार्थ्यांना घरी जायला सांगून शाळेला चक्क कुलूप ठोकलय .पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र आज एकही शिक्षक शाळेत न आल्यानं बराच वेळ विद्यार्थी तसेच बसून होते. ही बाब पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाळेत धाव घेऊन विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितलं आणि शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावलं आणि अनुपस्थित असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Sep 09, 2025 17:02 (IST)

Live Udate: अकोल्यात चारचाकीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

अकोल्याच्या बिर्ला गेट, रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनायक देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल समोर एका चारचाकी वाहनाला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, काही क्षणातच गाडी जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या प्रकरणाचा पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत.

Advertisement
Sep 09, 2025 17:01 (IST)

Live Update: कणकवली हळवल फाटा येथे 18 चाकी ट्रेलरचा अपघात

कणकवली मुंबई - गोवा महामार्गावर अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने आल्याने येथील तीव्र वळणावर पलटी झाला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरचा अपघात मंगळवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास झाला. या तीव्र वळणावर नेहमी अपघात होत असतात त्यामुळे हा मार्ग प्राधिकरणाने लहान डिव्हायडर देखील घातले आहेत तरी देखील अपघाताची मालिका सुरू आहे त्यामुळे ठोस उपाययोजना या वळणावर होण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे

Sep 09, 2025 17:00 (IST)

Live Update : गोकुळच्या सभेत राडा, पण शेवटी बैठक सुरळीत पार पडल्याचा दावा

गोकुळ दूध संघाच्या सभेत दरवर्षी गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत असतं. सत्ताधारी पॅनेलच्या शेवटच्या सभेत देखील गोंधळच झाला. प्रश्नोत्तराच्या काळात दोन्ही बाजूकडून जोरजोरात घोषणाबाजी झाली. मात्र यंदा अध्यक्षानी पहिल्यांदाच शांततेत अहवाल वाचन केलं. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या गोंधळामुळे गोकुळची सभा म्हणजे राडा हे कायमच राहील. ठरावाच्या मंजुरीनंतर ही सभा पूर्ण झाली. 

Sep 09, 2025 14:52 (IST)

Live Update : अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे कोळंबी व्यवसायाला मोठा फटका

अमेरिकेने लादलेल्या टेरिफमुळे कोळंबी व्यवसायाला मोठा फटका

- भारतातली 90 टक्के कोळंबी ही अमेरिकेत जाते

- मात्र आता टेरिफमुळे कोळंबीची मागणी कमी झाल्याने भाव घसरले

- यामुळे कोळंबी साफ करणाऱ्या महिलांच्या रोजगारावर देखील येणार गदा

- मच्छीमार लोकांनी आता कोळंबी पकडण्याऐवजी स्क्विड पकडण्याला दिलेय प्राधान्य

Sep 09, 2025 14:51 (IST)

Live Update : चाकूचा धाक दाखवणारी महिला चेन स्नॅचर पोलिसांच्या तावडीत

नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या चैन स्नॅचिंगचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणला.. शिवणगाव पुनर्वसन परिसरात ही घटना घडली. फिर्यादी सुमन कृष्णाजी जरोंडे ६५ वर्षीय महिला या आपल्या घरासमोर फेरफटका मारत असताना, अज्ञात महिलेने पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर गळ्याला चाकू लावून साठ हजार किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून आरोपी महिला तिथून पळ काढला...

फिर्यादी महिलेने बिल तेवढी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली यानंतर पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण आणि साक्षीदारांचे जबाब तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर आरोपी महिला ताब्यात घेण्यात आली असून चोरीस गेलेला मुद्देमाल शंभर टक्के जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.  

Sep 09, 2025 14:50 (IST)

Live Update : लासलगाव, मनमाडमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच...

नाशिकच्या  लासलगाव, मनमाडसह  जिल्ह्यातील विविध बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून प्रतिक्विंटल 300 रुपये दराने कांद्याचे भाव घसरले आहेत.1500 रुपयांवरून 1200 रुपये प्रती क्विंटल भाव खाली आले आहेत.श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क पाचपट वाढविले तर बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात मंदावल्याने त्यांचा थेट परिणाम कांदा भावावर होत असून, कांद्याच्या. भावात वाढ होईल या आशेने कांदा उत्पादकांनी चार चार महिन्यांपासून कांदा चाळीत साठवून ठेवला मात्र कांद्याच्या भावात वाढ होण्याऐवजी कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून, शासनाने कांद्याला किमान प्रती क्विंटल 2500 ते 3000 रुपये भाव मिळेल अशी व्यवस्था करावी किंवा प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे..

Sep 09, 2025 14:18 (IST)

Live Update : जो कोणी त्या आरोपीचा एक पाय, एक हात आणि लिंग कापेल त्याला आपण एक लाखाचे बक्षीस देऊ; ठाकरे सेनेचा इशारा

गणेश विसर्जनाच्या दिवशी घरातील लोक विसर्जनासाठी गेल्याची संधी साधत एका नराधमाने अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होतीय. तेव्हापासून या प्रकरणातील 28 वर्षीय आरोपी तौहिद समीर खान हा अद्यापही फरार असून या प्रकरणावरून सामान्यांसह राजकीय नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी आज रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि त्या पीडित मुलीच्या कुटूंबाला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली तर जो कोणी त्या आरोपीचा एक पाय, एक हात आणि लिंग कापेल त्याला आपण एक लाखाचे बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे.

Sep 09, 2025 14:16 (IST)

Live Update : नेपाळचे पंतप्रधान ओलींचा राजीनामा, तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये राजकीय भूकंप

नेपाळचे पंतप्रधान ओलींचा राजीनामा

तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये राजकीय भूकंप

Sep 09, 2025 13:08 (IST)

Live Update : गोकुळच्या सभेला शांततेत सुरुवात

गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला शांततेत सुरुवात. दरवर्षी या सभेच्या सुरुवातीला गोंधळ सुरू होत असतो. मात्र यंदाही सभा शांततेत सुरू झाली आहे. विरोधी गटातील संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांमध्ये बसणं पसंत केलं. सभेसाठी मंत्री हसून मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के पी पाटील हे देखील सभासदांमध्ये उपस्थित.   ठराव मांडण्यास सुरुवात झाली .

Sep 09, 2025 13:06 (IST)

Live Update : मी सभासदांसोबत.., गोकुळ वार्षिक सभेत संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर बसणं टाळलं

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे, या सभेला गेली चार वर्षे विरोधाची धार कायम ठेवलेल्या संचालिका शौमिका महाडिक यांना अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी यंदाच्या सभेला व्यासपीठावर बसण्याचं आवाहन केलं होतं मात्र महाडिक यांनी सभासदांसोबत बसण्याला प्राधान्य दिलं, गोकुळ प्रशासनाला दिलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरं मिळावी अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली. 

Sep 09, 2025 13:00 (IST)

Live Update : आज गोकूळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, शौमिका महाडिक काय भूमिका घेणार याकडे लक्ष

गोकूळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आहे. या सभेला विरोधी संचालिका शौमिका महाडिक काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं..कारणं गेल्या चार वर्षात शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेत व्यासपीठा खालून सभासदांचे प्रश्न मांडले होते..सत्ताधाऱ्यांना कडाडून विरोध करत धारेवर धरलं होतं..मात्र आता विद्यमान अध्यक्ष महायुतीचे झाल्याने त्यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बसण्यासाठी विनंती केली आहे..त्यामुळे शौमिका महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.. महायुती म्हणून आपण युती धर्म पाळणार आहे.. या सभेला कोणत्याही प्रकारे गोंधळ होणार नाही..गालबोट लागणार नाही.. सध्या ही सभा सुरू झाली. 

Sep 09, 2025 12:56 (IST)

Live Update : पावसामुळे घराची भिंत कोसळून एक जखमी

मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार  पावसामुळे साक्री तालुक्यातील दातर्ती येथे आदिवासी भागात घराची भिंत कोसळली. या भिंतीखाली दृष्टिहीन असलेल्या कमलाबाई मोरे ही महिला तब्बल चार तास दबलेली राहिल्याने गंभीर जखमी झाली असून सदर महिलेला 'ॲम्बुलन्स'द्वारा साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चार तास भिंतीच्या खाली पाण्यात राहिल्यानंतर त्यांचे  दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. कमलबाई मोरे यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे एकट्या असलेल्या कमलबाई मोरे यांच्या घराचा पंचनामा करून शासनाने मूलबाळ नसलेल्या आदिवासी दांपत्याला पक्के घर बांधून द्यावे व भिंतीखाली दाबल्या गेल्याने तब्येतीवर झालेल्या विपरीत परिणाम व गेलेली दृष्टी यासाठी कमलबाईच्या पुढच्या उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Sep 09, 2025 12:40 (IST)

Live Update : नमो शेतकरी योजनेचा हफ्ता खात्यात जमा होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

नमो शेतकरी योजनेचा हफ्ता खात्यात जमा होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन 

नमो शेतकरी योजनेचा हफ्ता खात्यात जमा होणार 

शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतनंतर मुख्यमंत्रांनी मीडियाशी साधला संवाद

Sep 09, 2025 12:35 (IST)

Live Update : नाशिकमध्ये पीपीई किट घालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा..

नाशिकमध्ये आज आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट असा मोर्चा काढला असून 

सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात पिपीई घातलेल्या महिला डॉक्टर्सने सर्वांचे लक्ष वेधले असून कोरोना काळात जीव धोक्यात घालूनही सरकार आमच्याकडे लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 19 ऑगस्टपासून हे कर्मचारी नाशिकमध्ये उपोषणाला बसले होते आणि आज त्यांच्यावर मोर्चा काढण्याची वेळ आली असून राज्यभरात 38 हजार हुन अधिक कर्मचारी उपेक्षित आहेत. 

Sep 09, 2025 11:45 (IST)

Live Update : शेमल्या गावाचा वीर गमावला, लद्दाखमध्ये सैन्यदलाचा जवान दिनेश पावरा यांना वीरमरण

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेमल्या गावाचे  वीर जवान दिनेश तुफान पावरा यांना भारतीय सैन्यदलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कर्तव्यावर असताना लद्दाखमध्ये विरमरण आले आहे. दोन वर्षांपूर्वी लष्करात भरती झालेल्या दिनेश पावरा यांचे आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार शेमल्या गावात करण्यात येणार आहे.

आज दिनेश पावरा यांचे पार्थिव शेमल्या गावात आणले जाणार आहे. दिनेश पावरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील आणि तीन भाऊ असा दुःखद परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घरासमोर व गावभर "भारतीय जवान दिनेश पावरा अमर राहो" असे बॅनर्स लावले गेले आहेत. प्रशासनानेही अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली असून, योग्य ती पाहणी केली आहे. गावकऱ्यांनी सैनिक दिनेश पावरा यांच्या शौर्याची स्तुती करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची तयारी केली आहे.

Sep 09, 2025 11:42 (IST)

Live Update : छगन भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळात बैठकीला अनुपस्थित राहणार?

छगन भुजबळ सलग दुसऱ्या मंत्रिमंडळात बैठकीला अनुपस्थित राहणार?

उपसमितीच्या शिफारसी नुसार काढण्यात आलेला शासन निर्णयाचा निषेध करण्याची भुजबळांची मंत्री म्हणून वेगळी तर्हा

पक्षाच्या प्री कॅबीनेट बैठकीला राहणार उपस्थित पण मुख्य बैठकीला मात्र राहणार अनुपस्थित.

ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी बोलावलेला बैठकीला सुद्धा राहणार अनुपस्थित

* समता परिषदेचे पत्र देण्यासाठी भुजबळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट.

Sep 09, 2025 11:42 (IST)

Live Update : ठाकरेंचे सेनेकडून बुधवारी राज्यव्यापी आंदोलन

ठाकरेंचे सेनेकडून बुधवारी राज्यव्यापी आंदोलन

जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचे आंदोलन

मुंबईत देखील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठाकरेंच्या सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार

ठाकरेंच्या सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला असणार उपस्थित

Sep 09, 2025 10:42 (IST)

Live Update : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मतदान

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मतदार

Sep 09, 2025 10:41 (IST)

Live Update : दोन तरुणींनी मुलांचा वेष धारण करून तीन साथीदारांसह ट्रकचालकांना लुटलं

नाशिकमध्ये दोन तरुणींनी मुलांचा वेष धारण करून तीन साथीदारांसह ट्रकचालकांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रकचालकांनी 112 वर फोन करून मदत मागितल्यावर पोलिसांनी सापळा रचत दोन्ही तरुणींना शिताफीने ताब्यात घेतले असले तरी मात्र त्यांचे तीन साथीदार फरार झाले. रमेश्वर वर्मा या ट्रकचालकाला अडवून आरोपींनी मारहाण करून 8 हजार रुपये लुटले. पोलिस चौकशीत आरोपींनी सहा महिन्यांत 3-4 नाही तर 30 ट्रकचालकांची लूट केल्याची कबुली दिली. या टोळीतील प्रेम घाटे, धीरज घाटे, शुभम आडे हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Sep 09, 2025 10:40 (IST)

Live Update : धुळ्यातील संबोधी नगरात धाडसी घरफोडी; महिलेला बांधून घरफोडी केल्याची चर्चा..

धुळे शहरातील एसआरपीएफ कॅम्प शेजारी असलेल्या संबोधी नगरात आज पहाटे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. घरातील महिलेचे हात बांधून व चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

सुरत बायपास रस्त्यावरील संबोधी नगरात जितेंद्र नानाभाऊ फुले हे आपल्या परिवारासह राहतात. ते एमआयडीसीत कामाला असून त्यांची पत्नी फुले ह्या परिचारिका आहेत. त्यांच्याकडे पाहूणे आलेले होते. या पाहुण्यांना सोडण्यासाठी जितेंद्र फुले हे आज पहाटेच्या सुमारास बसस्थानकावर गेले होते. यावेळी त्यांची पत्नी घरात एकटी असल्याची संधी साधत दोन चोरटे घरात शिरले. त्यांनी फुले यांचे हात बांधले व चाकुचा धाक दाखवत कपाटातून सुमारे 3 ते 4 ग्रॅम सोने, 6 ते 7 भार चांदी, दोन-तीन हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला व चोरटे पसार झाले. 

विशेष म्हणजे चोरट्यांनी जाताना फुले यांचे बांधलेले हात सोडले. जितेंद्र फुले हे घरी आले असता त्यांना फुले यांनी हकीकत सांगितली. घटनेची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे व तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होत चोरट्यांचा शोध सुरू आहे आहे.

Sep 09, 2025 10:40 (IST)

Live Update : अमरावतीच्या बडनेरा येथे काँग्रेसला मोठा धक्का

अमरावतीच्या बडनेरा येथे काँग्रेसला मोठा धक्का..

* काँग्रेसच्या शेकडो महिला पदाधिकाऱ्यांनी घेतला युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश...

* आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश...

* महिलांचा खरा सन्मान हाच युवा स्वाभिमान पार्टीचा अभिमान, आमदार रवी राणा यांचं मत...

Sep 09, 2025 08:43 (IST)

Live Update : वाघाच्या हल्ल्यात सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी महिला ठार, प्रकल्पातील दुसरी घटना

घरातील भांडे बाहेर घासण्यासाठी आणलेल्या एका कुष्ठरोगी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना पहाटेच्या दरम्यान सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथे घडली. सोमनाथ प्रकल्पातील ही दुसरी घटना आहे. मृतक महिलेचे नाव अन्नपूर्णा बिलाने वय (60) या घटनेने प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीतील रहिवास्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रकल्पामध्ये प्रशासन, वनविभाग आणि शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दयावे अशी मागणी होत आहे. सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये 350 कुटुबांचा वास्तव्य आहे. प्रकल्पाचे समन्वयक अरूण कदम यांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागला दिली.वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.

Sep 09, 2025 08:42 (IST)

Live Update : हर्सूल कारागृहामध्ये पाच कैद्यांचा तुरुंग अधिकार्‍यावर हल्ला

हर्सूल कारागृहातील यार्डमध्ये राऊंड घेत असताना हत्या आणि अपहरणातील कैदी संशयास्पद रित्या आढळून आले होते त्या पाच कैद्यांनी चांगलाच राडा केला. तुरुंग अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यावर या कैद्यांनी हल्ला केला . रितेश पुसे, पवन जयस्वाल, विनोद शिंदे, आनंद लोखंडे, ओम म्हस्के अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी हत्या, अपहरण सारख्या विविध गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. कारागृहामध्ये हे सर्वजण संशयितरित्या आढळून आल्यानंतर त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे धारदार पत्राचा तुकडा आढळून आला. याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गोंधळ घालत अधिकाऱ्यावर हल्ला चढवला.

Sep 09, 2025 07:55 (IST)

Live Update : सव्वाशे वर्षांच्या परंपरेत भावपूर्ण निरोप; माजलगावच्या मानाच्या टेंबे गणपती विसर्जनात भक्तांचा जल्लोष

बीडच्या माजलगावातील मानाचा टेंबे गणपती सव्वाशे वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेनुसार भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. निजाम काळी असलेल्या या गणपतीला ढोल-ताशांच्या गजरात, भक्ती आणि उत्साहाच्या लाटेत विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या वर्षी विशेष आकर्षण दिसले. पावणेदोन किलो चांदीचे दागिने, सोन्या-चांदीचे मोदक, दूर्वा अशा अनोख्या अर्पणांनी गणरायाला भक्तांनी नवस फेडले. आमदार प्रकाश सोळंके आणि खासदार अजित गोपछडे यांनी लाखो रुपयांची मदत जाहीर केली. विसर्जन मिरवणुकीत शाहिस्तेखानाची फजिती, जगन्नाथाचा रथ आणि ऑपरेशन सिंदूरचे देखावे लक्षवेधी ठरले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत परंपरेला सुरक्षित आणि भव्य स्वरूप दिले.

Sep 09, 2025 07:54 (IST)

Live Update : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; आरोपीला फाशीची मागणी

अकोल्यात अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महिला व बालकल्याण भवन येथे तीव्र आंदोलन छेडले. महागाई, एफआरएस प्रणाली, मातृ वंदन, लाडकी बहीण योजना व अन्य प्रलंबित मागण्यांवर संतप्त प्रतिक्रिया देत, १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला. कॉ. नयन गायकवाड, रमेश गायकवाड, सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. कामाचा दबाव टाकल्यास अधिकाऱ्यांना घेराव आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Sep 09, 2025 07:54 (IST)

Live Update : अतिवृष्टीची नोंद नाही; नुकसानभरपाईसाठी ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन

माजलगावच्या मोठेवाडी गावात ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आणि जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीची नोंद करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. गंगामसला मंडळातील पर्जन्यमापक खराब झाल्याने पावसाची नोंद झाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, ग्रामीण बँकेने खात्यांवर लावलेला होल्ड हटवणे आणि रस्त्यांचे मुरूम-खडीकरण करण्याच्या मागण्यांसाठी ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने झोपेचे सोंग सोडलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.