Tamil Nadu Election 2026: 'थलपती' विजय देणार आमदारकीचा राजीनामा! काय आहे कारण?

Tamil Nadu Election 2026: विजयने तिरुचिरापल्ली (पूर्व) आणि पेरंबूर या दोन्ही जागांवर विजय मिळवला असून, ते तिरुचिरापल्ली (पूर्व) जागेचा राजीनामा देऊन पेरंबूरची जागा कायम ठेवण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Tamil Nadu Election 2026: तामिळनाडूच्या राजकारणात 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. अभिनेता थलपती विजय याच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने पदार्पणातच 108 जागा जिंकून 62 वर्षांपासून चालत आलेल्या DMK आणि AIADMK च्या सत्तेला सुरुंग लावला आहे.  या विजयानंतर विजयच्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदी बसणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

दोन जागांवर विजय आणि राजीनाम्याचा निर्णय

विजयने या निवडणुकीत दोन मतदारसंघांतून नशीब आजमावले होते आणि दोन्ही ठिकाणी तो मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. पेरंबूर (चेन्नई) येथे विजयने DMK च्या आर. डी. शेखर यांचा 53,715 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय ही जागा स्वतःकडे कायम ठेवणार आहेत.

Advertisement

तिरुचिरापल्ली - पूर्व (Trichy East) येथे विजयने DMK च्या इनिगो इरुदयाराज यांचा 27,416 मतांनी पराभव केला. मात्र, आता विजय या जागेचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

ऐतिहासिक विजयाचे समीकरण

तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी TVK ने 108 जागांवर विजय मिळवला आहे. बहुमतासाठी 118 जागांची गरज असून, उर्वरित जागांसाठी काँग्रेस, डावे पक्ष किंवा AIADMK सोबत वाटाघाटी करण्याचे पर्याय TVK समोर आहेत. या निवडणुकीत DMK ला 59 तर AIADMK ला 47 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

राजकीय रणनिती आणि मतदारांचा कल

पेरंबूर हा उत्तर चेन्नईचा भाग असून DMK चा बालेकिल्ला मानला जात असे. येथे विजयच्या विजयाने त्यांच्या शहरी लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ चेन्नईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण तामिळनाडूत आपली व्याप्ती वाढवण्यासाठी विजयने तिरुचिरापल्ली येथून निवडणूक लढवली होती. 

विजयवर तामिळनाडूच्या जनतेने विश्वासही दाखवला. जुन्या द्रविडियन राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांसाठी विजय हा एक 'नवा पर्याय' म्हणून समोर आले आणि त्यांनी 'थलापथी'वर विश्वास टाकला.
 

Advertisement
Topics mentioned in this article