Viral Video: मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नातील मेहंदी कार्यक्रमात उत्साहाने डान्स करणाऱ्या मामाचा अचानक मृत्यू झाला. सुरुवातीला नातेवाईकांना ती डान्स स्टेप वाटली. मात्र काही वेळातच लग्नसराईच्या धामधुमीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत.
'रब से क्या मांगू' गाण्यावर डान्स आणि मृत्यू
बडवानी जिल्ह्यातील पिपलुद येथील रहिवासी असलेले घनश्याम यादव हे आपल्या कुटुंबासह ओझरा येथे भाच्याच्या लग्नासाठी आले होते. मंगळवारी रात्री लग्नात मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. सर्व नातेवाईक संगीताच्या तालावर थिरकत होते. घनश्याम यादव हे आपल्या पत्नीसोबत 'रब से क्या मांगू, जब तू मेरे करीब...' या गाण्यावर डान्स करत होते.
VIDEO
(नक्की वाचा- VIDEO: बॅडमिंटन खेळता खेळता काळाचा घाला! व्यावसायिकाचा हार्टअटॅकने अंत गाण्याच्या तालावर डान्स करत असतानाच घनश्याम अचानक जमिनीवर कोसळले. ते जमिनीवर पडल्यानंतर उपस्थित असलेल्या नातेवाईकांना वाटले की ही त्यांच्या डान्समधील एखादी 'स्टेप' आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम जमिनीवर पडल्यावर काही सेकंद लोक हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. मात्र, बराच वेळ झाला तरी त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल झाली नाही, तेव्हा नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (नक्की वाचा- Cabinet Reshuffle: 'महायुती'मध्ये भाकरी फिरणार? शिवसेनेच्या या 2 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?) डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर घनश्याम यादव यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची पुष्टी केली. लग्नासारख्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.नातेवाईक हसत राहिले अन्...
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू